Economic Crisis : आर्थिक संकट काही हटेना; रुपयाची घसरण सुरूच! 

indian rupaya
indian rupaya

नवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनामुळे मोठं आर्थिक संकट आलं आहे. भविष्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने आता गुंतवणूकदार चांगलेच चिंतेत आहेत. याकारणास्तव आता आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीचे भावही उतरले आहेत. तसेच सगळे गुंतवणूकदार अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुकता दाखवत आहेत. त्यामुळे आता भारतीय रुपया डगमगला असून प्रतिडॉलर तो 74 रुपयांपर्यंत गेला आहे.  

सामान्य लोकांवर काय परिणाम- 
भारताला आवश्यक असणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांपैकी भारत 80 टक्के आयात करतो. आता रुपया उतरल्याने पेट्रोलियम पदार्थ महाग होऊ शकतात. मोठ्या तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वाढवण्याची शक्यता आहे. भारतात खाद्य तेलांचीही मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, आता त्याच्याही किंमती वाढू शकतात. यामुळे देशात पहिलंच आर्थिक संकट असताना अजून महागाई वाढू शकते. 

भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम-
एका आर्थिक सर्वेत असं सांगितलं आहे की, जर भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत एक रुपयांनी घसरला तर तेल कंपन्यांना 8 हजार करोड रुपयांचा तोटा होतो. यामुळे त्यांना पेट्रोल- डिझेलचे भाव वाढवावे लागतात. पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीमध्ये 10 टक्के वाढ झाली तर महागाई देशात 0.8 टक्क्याने वाढते. याचा प्रत्यक्ष परिणाम खायच्या-प्यायच्या वस्तूंसह देशातील वाहतुकीवरही पडतो. 

भारतीय रुपयांत कसा बदल होतो-
 तज्ज्ञांच्या मते रुपयाची किंमत उत्पादन आणि मागणीवर ठरत असतो. यावर आयात- निर्यातीचाही परिणाम होतो. प्रत्येक देशांजवळ दुसऱ्या देशांचा चलनाची साठा असतो. जी ते देश आयात-निर्यातीमध्ये वापरत असतात. याला 'परकीय चलनाचा साठा' म्हटले जाते. वेळोवेळी याचे आकडे देशातील मध्यवर्ती बॅंक जाहीर करत असते. जर सोप्या भाषेत म्हटलं तर समजा भारत अमेरिकेसोबत एक व्यवहार करत आहे. अमेरिकेजवळ 67 हजार रुपये आहेत आणि आपल्या जवळ 1 हजार डॉलर रुपये आहेत. जर डॉलरचा भाव 67 रुपये असेल तर दोन्ही देशांजवळ समान रक्कम असल्याचे समजावे. 

अमेरिकन डॉलर वधारल्याने जागतिक कमॉडिटी मार्केटमध्येही अस्थिरता दिसली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरात घट दिसून आली आहे. 

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com