Amazon Layoffs : ट्विटर,मेटा नंतर आता ॲमेझॉनही देणार कर्मचाऱ्यांना नारळ

ट्विटर आणि मेटा नंतर आता ॲमेझॉन मधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत.
Amazon
AmazonSakal

Layoffs 2022 : Twitter आणि Meta नंतर आता Amazon मधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. Amazon आपल्या कर्मचार्‍यांना काढून टाकत आहे. यासोबतच कंपनीने नव्या नोकरभरतीवरही बंदी घातली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती पाहता कंपनीने नोकरभरती रखडली आहे. यापूर्वी फेसबुकची मूळ कंपनी मेटाने आपल्या 11 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

हेही वाचा : विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

अमेरिकन तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स मधील मोठी कंपनी Amazon ने वाढत्या आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरुवात केली आहे. एका उच्च अधिकाऱ्याने पाठवलेल्या अंतर्गत मेमोनुसार, कंपनीने गेल्या आठवड्यातच हायरिंग फ्रीज जाहीर केले होते. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते.

Amazon
Rupee vs Dollar : नऊ वर्षा नंतर रुपयाला 'अच्छे दिन'; वाचा काय आहे कारण

ॲमेझॉनमध्ये काम करणा-या सॉफ्टवेअर इंजिनिअर जेमी झांगने लिंक्डइनवर त्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती दिली.

याव्यतिरिक्त, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की कंपनीने काही युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर मेटा आणि ट्विटरनेही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर, कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com