NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

RTGS transfe
RTGS transfe

नवी दिल्ली: कोणत्याही यंत्रनेच्या नियमांत ठराविक काळानंतर नियमांत बदल होत असतो. देशातील बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातही नवीन अपडेटसह काही बदल होत असतात. बँकीग क्षेत्राचा विचार केला तर फंड ट्रान्सफर ही महत्वाची गोष्ट आहे. यासाठी बँकांकडून विविध सेवा दिल्या जातात. तसेच मागील काही दिवसांपासून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर पाठवण्याच्या प्रमाण मोठे वाढले आहे.

जर आपल्याला दोन लाखांपेक्षा जास्तीची रक्कम पाठवायची असेल तर RTGS (Real-time gross settlement) चा वापर केला जातो. आता आरटीजीएसच्या नियमांत डिसेंबरपासून काही बदल होणार आहेत. 

आता कोणत्याही वेळी करता येईल RTGS-
1 डिसेंबरपासून  रियल टाइम ग्रॉस सेटलमेंटची सुविधा आठवड्याच्या सातही दिवसांत आणि वर्षभर उपलब्ध असेल. यापुर्वी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असायची. तर बाकी कामकाजाच्या दिवशी सकाळी सात ते रात्री सहा वाजेपर्यंत या सिस्टममधून पैसे पाठवता येतात. हा निर्णय लहान-मोठ्या उद्योगधंद्यांना मोठा फायद्याचा ठरणार आहे. ज्यांना आता मोठी रक्कम पाठवायची असेल तर वाट पहावी लागणार नाही. मागील वर्षी NEFTची (National Electronic Funds Transfer) सुविधाही चोविस तास सुरु केली होती.

आरबीआयच्या गव्हर्नरनी दिली माहिती-
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी मागील महिन्यात मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या द्वैमासिक बैठकीनंतर सांगितले की, या वर्षी डिसेंबरपासून रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सुविधा उपलब्ध असेल.  

RTGS ला 24x7x365 मुभा दिल्याने भारत जगातील मोजक्या देशांच्या यादीत जाईल. यामुळे दिवसातील कोणत्याही वेळी पैसे पाठवता येणार आहेत. यापुर्वी सुट्टीच्या दिवशी मोठी रक्कम पाठवायची असेल तर मोठ्या उद्योगधंद्याना किंवा पैसे पाठवणाऱ्यांना अडचणी याचच्या पण आता या नवीन बदलांमुळे याचा फायदा होणार आहे.

आरटीजीएस सिस्टम कसं काम करते?
आरटीजीएस सिस्टममधून पैसे पाठवल्यानंतर ते बेनिफिशियरीच्या बँकेच्या शाखेत रिअल टाइममध्ये प्राप्त होतात. यानंतर बँकेला दोन तासांच्या आत बेनिफिशियरीच्या अकाउंटला पैसे क्रेडिट करावे लागतात. 

आरटीजीएस आणि एनईएफटीबद्दल अधिक माहिती जाणून घ्या 
RTGS-
-आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे 2 लाख रुपये हस्तांतरित करता येऊ  शकतात.  ‘आरटीजीएस’ या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येते. आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) पद्धत सर्वसाधारणपणे देशातील केंद्रीय बँकांकडून वापरली जाते. मोठे व्यवहार आरटीजीएसमार्फत सुरक्षितरीत्या केले जातात. आरटीजीएस ही एक आर्थिक व्यवहाराची अशी पद्धत आहे की त्यात एका बँकेतून दुसर्‍या बँकेत आर्थिक हस्तांतरण होता वास्तविक वेळेत व्यवहार होतात. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या वेळेतच अशा प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. 

NEFT
एनईएफटीमुळे देशभरात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणे सुलभ व लवकर होते. एनईएफटी मध्ये देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात.

एनईएफटी सुविधा 63,000 बँकांद्वारे संपूर्ण देशभर तसेच नेपाळला देखील पुरवली जाते. निधी ऑनलाईन हस्तांतरित करण्याची परवानगी देते. क्रेडिट कार्डवरील रकमेच्या पेमेंटसाठी देखील याचा वापर केला जातो.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com