एअर इंडियाच्या अडीच लाख प्रवाशांना मिळाला १५० कोटींचा परतावा!

कोरोनामुळे विमान कंपन्या मोठा फटका बसला आहे. तसेच सतत रद्द करण्यात आलेल्या विमानामुळे प्रवाशांना तिकिटांचा परतावाही एक मोठी समस्या होती.
Air India
Air Indiasakal
Summary

कोरोनामुळे विमान कंपन्या मोठा फटका बसला आहे. तसेच सतत रद्द करण्यात आलेल्या विमानामुळे प्रवाशांना तिकिटांचा परतावाही एक मोठी समस्या होती.

मुंबई - कोरोनामुळे विमान कंपन्या मोठा फटका बसला आहे. तसेच सतत रद्द करण्यात आलेल्या विमानामुळे प्रवाशांना तिकिटांचा परतावाही एक मोठी समस्या होती. मात्र, एअर इंडियाने प्रवाशांना जलद गतीने परतावा मिळावा याकरिता 'परतावा प्रक्रिया' जलद केली आहे. गेल्या काही महिन्यात २ लाख ५० हजारपेक्षा जास्त प्रवाशांना १५० कोटी रुपये परत केले असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

देश विदेशातील सर्व विमान कंपन्यांप्रमाणे, एअर इंडियावर कोरोनामुळे गंभीर परिणाम झाले होते. तसेच विमान प्रवाशांच्या प्रवास योजनांवर परिणाम झाला होता. एअर इंडियाचा ताबा टाटा समूहाने घेतल्यानंतर प्रवाशांच्या अपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या वेगाने सोडवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलले आहे. यामध्ये एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना प्रलंबित परतावा जलद मिळावा याकडे लक्ष दिले आहे.

आतापर्यत २ लाख ५० हजारहून अधिक प्रवाशांना पहिल्या काही महिन्यांत १५० कोटी रुपये परत केले आहे. परतावा प्रक्रिया आणि प्रणाली सुधारण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन परतावा प्रकरणे अधिक वेगाने वळवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले गेले आहे. आजपर्यंत, एअर इंडियाच्या संकेस्थळावर दाखल केलेल्या पात्र परताव्याच्या विनंतीवर सामान्यत: दोन ते तीन दिवसांत एअरलाइनद्वारे परताव्याची प्रक्रिया केली जात आहे.

एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अधिकारी राजेश डोगरा म्हणाले, "एअर इंडियाचे प्रवासी हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही प्रवाशांना प्रलंबित परतावाची प्रक्रिया जलद केली आहे. त्यामुळे आता विमान प्रवाशांना परताव्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. एअर इंडिया आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहे, जी आमच्यासाठी जागतिक दर्जाची विमान कंपनी म्हणून उदयास येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com