
Air India : प्रजासत्ताक दिनी टाटांची भन्नाट ऑफर, कमी किंमतीत मिळणार विमान तिकिटे; असे आहेत तिकीट दर
Air India Flight Ticket : काही दिवसात, देश प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्सही देतात. यानिमित्ताने एअर इंडियाने एक ऑफरही सादर केली असून कमी किमतीत विमान तिकीट देऊ केले आहे.
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, एअर इंडियाने देशांतर्गत नेटवर्कवर त्यांच्या फ्लाइट तिकिटांवर ऑफर सुरू केल्या आहेत.
सादर केलेली ही ऑफर 23 जानेवारीपर्यंत वैध असेल. अशा परिस्थितीत, या ऑफर अंतर्गत, 23 जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येईल आणि कमी किमतीत प्रवास करता येईल.
या ऑफर अंतर्गत तिकिटे एअरलाइनच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंटसह सर्व एअर इंडिया बुकिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. या ऑफरमध्ये देशांतर्गत फ्लाइटची तिकिटे कंपनीकडून कमी किमतीत लोकांना दिली जातील.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ही सवलतीची तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत भारतातील देशांतर्गत नेटवर्कवरील प्रवासासाठी लागू होतील.
कंपनीने सांगितले की, किंमत 1705 रुपयांपेक्षा कमी वन-वे भाड्यापासून सुरू होईल आणि लोकांना या ऑफर अंतर्गत 49 हून अधिक देशांतर्गत प्रवासांवर सूट मिळेल.
हेही वाचा: Bank FD : भारीच! पैसाच पैसा, दर महिन्याला मिळतेय 8.25% व्याज, आता आणखी काय हवंय...
एअर इंडियाने दिलेल्या ऑफरमधील तिकीट भाडे :
दिल्ली ते मुंबई - रु 5,075
चेन्नई ते दिल्ली - रु 5,895
बंगलोर ते मुंबई - रु. 2,319
दिल्ली ते उदयपूर - रु. 3,680
दिल्ली ते गोवा - रु 5,656
दिल्ली ते पोर्ट ब्लेअर - रु 8,690
दिल्ली ते श्रीनगर - रु. 3,730
अहमदाबाद ते मुंबई - रु. 1,806
गोवा ते मुंबई - रु. 2,830
दिमापूर ते गुवाहाटी - रु. 1,783