जिओला टक्कर: एअरसेलची खास ’786′ ऑफर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

नवी दिल्ली: रमजान ईदनिमित्त एअरसेलने ग्राहकांना एक नवी ऑफर देऊ केली आहे. रमजानच्या दिवशी ऑफर दिली जाणार आहे, त्यानुसार 786 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल आणि मोफत डेटा देण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, खासकरून विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

786 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना देशभरात मोफत व्हॉइस कॉलिंग करता येणार असून त्याचबरोबर प्रत्येक दिवशी 1 जीबी 3जी डेटाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 786 रुपयांच्या या प्लॅनची वैधता (​​व्हॅलीडिटी) 70 दिवसांपर्यंत असणार आहे. म्हणजेच कोणत्याही नेटवर्कवर मोफत व्हॉइस कॉलिंगसह 70 जीबी डेटा मिळणार आहे.

Web Title: Aircel's special '786' offer