ऐश्वर्या रायची 'या' स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक...

ऐश्वर्या रायची 'या' स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक...

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सुन, ऐश्वर्या राय बच्चन यांनी अॅम्बी (Ambee) या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. अॅम्बी ही स्टार्ट-अप कंपनी एअर प्युरिफायरच्या व्यवसायात आहे. ऐश्वर्या यांच्याबरोबरच त्यांची आई वृंदा केआर यांनीसुद्धा अॅम्बीमध्ये गुंतवणूक केली आहे. ऐश्वर्याने अॅम्बी या बंगळूरूस्थित स्टार्टअपमध्ये 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे. 

अलीकडेच इतरही काही बॉलीवृड कलाकारांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. यात प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे. प्रियांका चोप्राने डेटिंग अॅप बम्बल इंडिया, आलिया भटने फॅशन टेक्नॉलॉजी स्टार्टअप स्टाईलक्रॅकर, अक्षय कुमारने फर्नेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप गोकी (GOQii) आणि दीपिका पदुकोण यांनी ड्रम फुड्स इंटरनॅशनल या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ऐश्वर्या यांची स्टार्टअपमधील ही दुसरी गुंतवणूक आहे. याआधी 10 वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विंड पॉवर प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. अॅम्बी या स्टार्ट-अपची स्थापना 2017 मध्ये अक्षय जोशी, जयदिप सिंग आणि मधुसुदन आनंद यांनी केली होती. ही कंपनी हवेच्या दर्जाची पाहणी करते. त्यांनी बंगळूरूमध्ये आतापर्यत 100 सेन्सर बसवले आहेत. गुगल इंडियाचे माजी एमडी राजन आनंदन यांनीसुद्धा या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com