China Economic Crisis : चीन आर्थिक संकटात! 'या' दिग्गज कंपनीला बसला 2.9 अब्ज डॉलरचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Economic Crisis

China Economic Crisis : चीन आर्थिक संकटात! 'या' दिग्गज कंपनीला बसला 2.9 अब्ज डॉलरचा फटका

गेल्या काही महिन्यांपासून जगावर पुन्हा एकदा आर्थिक मंदीचा धोका असल्याची चर्चा आहे. त्यावर महागाईचा देखील दणका बसतोय. याचा परिणाम अमेरिका आणि चीन सारख्या देशांवर अधिक होताना सध्या दिसतोय. मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना काही दिग्गज कंपन्या मंदी सारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होत आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

ऑगस्ट महिन्यात चीनमधील टेक कंपनी अलीबाबा (Alibaba Group)ने 9 हजार 241 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या कर्मचारी कपातीमुळे अलीबाबाच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 45 हजार 700 इतकी झाली .

चीन हे जगातील सर्वात मोठे ई-कॉमर्स मार्केट आहे. यातील सर्वात मोठी कंपनी म्हणून अलीबाबाकडे पाहिले जाते. मात्र चिनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने गुरुवारी तिसर्‍या तिमाहीत 2.9 अब्ज डॉलरचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. कारण कंपनी आर्थिक मंदी आणि मक्तेदारी विरोधात लढत आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, हा तोटा प्रामुख्याने, सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या कंपन्यांमधील आमच्या इक्विटी गुंतवणुकीच्या बाजारभावातील घटीमुळे झाला आहे.