Income Tax
Income Tax sakal

इन्कम टॅक्सचे नवीन पोर्टल; जाणून घ्या करदात्यांसाठी कोणत्या सुविधा?

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी (Income Tax) आज सात जूनपासून नवे ‘ई-फाइलिंग वेब पोर्टल’(new web portal for taxpayers) सुरू करणार आहे. प्राप्तिकर विभागाची www.incometax.gov.in ही नवीन वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आयटीआर फाइलिंग करण्यासह अन्य सर्व महत्त्वाची कामं करता येणार आहे. (all-you-need-to-know-new-income-tax-return-e-filing-website)

या नवीन पोर्टलद्वारे करदात्यांना तातडीने आयटीआर फाईलिंग (ITR e-filing website केल्यानंतर रिफंड मिळावा यासाठी आणि ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या बरोबरच सर्व कामं वेगाने करता येणार आहेत. नवीन ई-फाइलिंग पोर्टलद्वारे करदात्यांना एक आधुनिक आणि अखंड सेवा देणे, हे सीबीडीटीचे (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) मुख्य उद्दिष्ट आहे.

Income Tax
स्मार्ट गुंतवणूक - म्युच्युअल फंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे

मोबाइल अ‍ॅप लवकरच सुरू होणार

सीबीडीटी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हे नवीन पोर्टल लाँच झाल्यानतंर काही दिवसांनी प्राप्तिकर विभाग एक नवे मोबाईल अ‍ॅपही सुरु करणार आहे. हे अ‍ॅप लॉन्च करण्यामागे करदात्यांना प्राप्तीकर विभागाच्या सुविधांबद्दल माहिती देऊन जागरूक करणे हा उद्देश आहे.

नवीन आयटीआर ई-फाइलिंग पोर्टलची वैशिष्ट्ये

1. करदात्यानी अपलोड केलेली सर्व कागदपत्रे, अपूर्ण राहिलेली कामे एकाच डॅश बोर्डवर दिसतील. तसेच सर्व प्रकारचे परस्परसंवाद (interactions) आणि अपलोड्स (uploads) हे एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे. त्यामुळे करदात्यांची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

2. आयटीआर 1, 4 आणि आयटीआर 2 भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअर उपलब्ध केले जाईल. करदात्याला प्राप्तिकरचे ज्ञान नसताना प्राप्तिकर भरण्याचे सोयीचे व्हावे म्हणून आधीच भरलेली सर्व माहिती सॉफ्टवेअरमध्ये असेल, जेणेकरून कमीत कमी माहिती भरावी लागेल. तसेच आयटीआर 3, 5, 6, 7 तयार करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल.

3. पगार, घर,मालमत्ता आणि अन्य व्यवसायासह उत्पन्नाचा तपशील भरताना करदात्याला आपले प्रोफाईल अपडेट करता येणार आहे. पुढे जाऊन त्याचा उपयोग आयटीआर दाखल करण्यासाठी केला जाईल.

Income Tax
कोविड एडव्हान्सची रक्कम PF मधून काढावी का? तज्ज्ञ काय म्हणतात?

4. करदात्याच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नवीन कॉल सेंटर देखील सुरू केले जाणार आहे. करदात्यांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न, नियमावली, व्हिडीओ या सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच इतर काही समस्या असल्यास चॅटबॉट आणि लाईव्ह प्राप्तिकर विभागच्या एजंटशी बोलण्याची सुविधा देखील मिळेल.

5. एसएफटी आणि टीडीएसची माहिती अपलोड झाल्यानंतर पगाराचे उत्पन्न, व्याज आणि भांडवली नफ्यासह प्री-फिलिंगची सुविधा उपलब्ध असेल.

प्राप्तिकर विभागाने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, "आम्ही नवीन पोर्टलच्या रोलआउटच्या अंतिम टप्प्यात आहोत आणि लवकरच उपलब्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com