esakal | मोठी बातमी : एकमेव कंपनी, भारतात देणार 50 हजार नोकऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

amazon will provide 50 thousand new jobs India

देशात सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने उद्योग व्यवसाय सुरू आले आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांचे काम देखील रुळावर येत आहे.

मोठी बातमी : एकमेव कंपनी, भारतात देणार 50 हजार नोकऱ्या

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन ऍमेझॉन 50 हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. देशभरात ऑनलाईन  वस्तू मागवण्याकडे ग्राहकांचा वाढता कल आहे. त्यामुळे ऍमेझॉनमधील कामाचा बोझा वाढला आहे. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन कंपनी भारतात 50 हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या कर्मचाऱ्यांची नोकरी हंगामी स्वरुपाची असणार आहे. 'वेअरहाऊसिंग' आणि 'डिलिव्हरी' विभागात या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. 

आणखी वाचा - जागतिक घडामोडींचा सोने-चांदी दरांवर परिणाम

कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या परिस्थितीत बहुतांश मोठ्या कंपन्या अभूतपूर्व अशी नोकरकपात करत असताना ऍमेझॉन मात्र कर्मचारी संख्या वाढवते आहे. वाढलेल्या मागणीला पुरवठा करण्यासाठी कंपनीने हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने उद्योग व्यवसाय सुरू आले आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांचे काम देखील रुळावर येत आहे. ऍमेझॉनचे ग्राहक विभागाचे उपाध्यक्ष (आशिया विभागातील) अखिल सक्सेना म्हणाले, 'कोरोनामुळे एक गोष्ट शिकलो आहे, ती म्हणजे ई-कॉमर्सने संकटाच्या काळात खूप मोठी भूमिका निभावली आहे. लहान व्यावसायिक, व्यापारी यांच्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारीने काम केले आहे. 

बिझनेस, व्यापार जगतातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेफ बेझॉसच्या संपत्तीत भर

  1. लॉकडाऊनच्या काळात ऍमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनी व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.
  2. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत 24 अब्ज डॉलरची भर पडली आहे.
  3. ऍमेझॉनच्या शेअरच्या किंमतीने नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.
  4. जेफ बेझॉस यांची संपत्ती 138 अब्ज डॉलरवर पोचली आहे.
  5. ऍमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचा 11 टक्के हिस्सा बेझॉस यांच्याकडे आहे.
loading image