अमेरिका-चीनमधील व्यापार घटला

Business-War
Business-War

बीजिंग - अमेरिका-चीनमधील संघर्षाचा फटका उभय देशांमधील व्यापाराला बसला असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत द्विपक्षी व्यापार २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने आणखी २०० अब्ज डॉलरच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क आकारणी केली, तर ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. 

व्यापारी संघर्षावर चर्चेसाठी चीनचे व्यापार प्रतिनिधी ९-१० मे रोजी अमेरिकेत दाखल होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सीमाशुल्क विभागाने व्यापाराशी संबंधित आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पहिल्या चार महिन्यांत उभय देशांमध्ये व्यापार १७३ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. तो २०१७ मधील याच कालावधीच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांनी कमी आहे. तिथेच एप्रिलमध्ये चीनने एकूण १९३.४९ अब्ज डॉलरची निर्यात केली. त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत २.७ टक्के घट झाल्याचे दिसून आले.

एप्रिल महिन्यातील स्थिती 
एप्रिलमध्ये चीनने अमेरिकेला केलेली निर्यात ३१.४ अब्ज डॉलर असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्के घट झाली आहे. अमेरिकेकडून झालेली आयातही २६ टक्‍क्‍यांनी घटली असून, गेल्या महिन्यात चीनने १०.३ अब्ज डॉलरची उत्पादने आयात केल्याची माहिती चीनच्या सीमाशुल्क विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com