esakal | अमेरिकेतील आयटी कंपनी देणार भारतातील 5.48 लाख जणांना रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

job.jpg

भारताच्या जीडीपीमध्ये दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता असल्याचे कंपनीचे मत आहे.

अमेरिकेतील आयटी कंपनी देणार भारतातील 5.48 लाख जणांना रोजगार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- अमेरिकेतील आयटी कंपनी सेल्सफोर्सने येत्या काही दिवसांत भारतातील 5.48 लाख जणांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या मते, भारताच्या जीडीपीमध्ये दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता असल्याचे कंपनीचे मत आहे. सेल्सफोर्सचे मुख्य डेटा अधिकारी अफशर रेज यांनी अप्रत्यक्षरित्या कंपनी भारतात 13 लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले की, आमची कंपनी भारताच्या अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलरचे योगदान देणार आहे. आम्ही आपल्या ग्राहक आणि भागीदारांबरोबर अप्रत्यक्षरित्या 13 लाख रोजगार निर्माण करणार आहोत. तर प्रत्यक्षरित्या आम्ही 5,48,000 जणांना रोजगार देणार आहे. सेल्सफोर्सचे बाजार भांडवल अंदाजे 240 अब्ज डॉलर आहे. येत्या एक ते दोन वर्षांत आम्ही 2.5 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. डिजीटल अंतर कमी करण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद; श्रीकांत दातार 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'चे नवे डीन

भारतात दर तीन सेंकदाला एक नवीन व्यक्ती इंटरनेटशी जोडला जातो. याचाच अर्थ इंटरनेटशी जोडले जाणाऱ्यांची संख्या ही आज 60 कोटी वरुन येत्या पाच वर्षांत 1 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भारत जीडीपीच्या तुलनेने जगातील दुसरा सर्वात मोठा देश होईल.