महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद;  श्रीकांत दातार 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'चे नवे डीन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

श्रीकांत दातार डीन म्हणून 1 जानेवारी 2021 पासून आपल्या पदावर रुजू होतील.

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती झाली आहे. याआधी भारतीय वंशाचेच असणाऱ्या नितीन नोहरीयांचीच ते जागा घेतील. आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल एचबीएस येथील युनिव्हर्सिटीतील वरिष्ठ सहकारी श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढचे डीन असलीत, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. श्रीकांत दातार डीन म्हणून 1 जानेवारी 2021 पासून आपल्या पदावर रुजू होतील. दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील. 

हेही वाचा - पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन

लॅरी बाको श्रीकांत दातार यांच्या नियुक्तीची घोषणा करताना म्हटले की, दातार हे एक नाविन्यपूर्ण शिक्षक आहेत, ते एक प्रतिष्ठीत विद्वान तसेच एक अनुभवी प्राध्यापक आहेत. व्यावसायिक शिक्षणाच्या भविष्याविषयी ते एक अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. कोरोना महामारीदरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना दोन हात करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये त्यांची बजावलेली भुमिका अत्यंत महत्वपूर्ण होती. या स्कूलमध्ये गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी प्रामाणिकपणे अनेक पदांवर आपली सेवा बजावत चांगली कामगिरी केली आहे, असंही ते म्हणाले. येत्या नव्या वर्षांपासूनचे ते या डीन पदाचा कार्यभार स्विकारतील. 

हेही वाचा - जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी 8400 कोटींचे विमान, राहुल गांधींचा निशाणा

दातार यांची कारकीर्द
दातार यांनी आपलं सुरवातीचे शिक्षण मुंबई विद्यापिठातून पुर्ण केलं आहे. 1973 साली ते विद्यापिठातून उत्तीर्ण झाले. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर त्यांनी अहमदाबाद येथील आयआयएममधून आपले पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयांत पीएचडी पूर्ण केली. 1984 ते 1989 या काळात ते कार्नेगी मेलॉन ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यानंतर 1996 पर्यंत त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापकी केली. दातार हे आयआयएम कोलकाताच्या गव्हर्निंग बॉडीचाही भाग आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: srikant datar named dean of harvard business school indian origin