Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपनीचा होणार लिलाव; 'या' कंपन्या घेऊ शकतात ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Ambani

Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपनीचा होणार लिलाव; 'या' कंपन्या घेऊ शकतात ताबा

उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलचा लिलाव होणार आहे. कंपनी या महिन्यात ई-लिलाव करण्याची तयारी करत आहे. ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. अनेक कंपन्यांनी रिलायन्स कॅपिटलला खरेदी करण्यासाठी ऑफर दिली आहे. आता बोलीच्या अनेक फेऱ्या होतील आणि रिलायन्स कॅपिटल सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीला विकेल.

पिरामल एंटरप्रायझेस-कॉस्मे फायनान्शियल होल्डिंग्सने सर्वाधिक 5,231 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे आणि ही ई-लिलावासाठीची मूळ किंमत असेल असे कंपनीने संगितले आहे. पिरामल एंटरप्रायझेस-कॉस्मी फायनान्शियल होल्डिंग्ज व्यतिरिक्त, हिंदुजा ग्रुप, टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स आणि ओक्ट्री कॅपिटल यांनीही रिलायन्स कॅपिटल आणि त्याच्या सहयोगी कंपन्यांना खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

रिलायन्स कॅपिटल आणि त्यांच्या कंपन्यांसाठी सर्वात मोठी ऑफर त्यांच्या लिक्विडेशन मूल्यापेक्षा 60 टक्के कमी आहे. डफ अँड फेल्प्स आणि आरबीएसएने रिलायन्स कॅपिटल आणि तिच्या उपकंपन्यांचे मूल्य रु. 12,500 कोटी ते 13,000 कोटी रुपये केले आहे.

Piramal-Cosmi कंपनी 5,231 कोटी रुपयांची ऑफर आहे, तर पिरामलने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 3,750 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. उर्वरित कंपन्यांसाठी COSMI ने 1,481 कोटी रुपयांची बोली लावली आहे. दोन्ही कंपन्यांनी 4,250 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट केले आहे.

हेही वाचा: कशी नशीबानं थट्टा मांडली! मुकेश अंबानीच्या भावावर कर्जाचा डोंगर, आता तर...

हिंदुजा समूहाने रिलायन्स आणि त्यांच्या कंपन्यांसाठी 5,060 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. यामध्ये 4,100 कोटी रुपयांच्या आगाऊ पेमेंटचा समावेश आहे. टोरेंट इन्व्हेस्टमेंट्सने 4,500 कोटी, ओक्ट्रीने 4,200 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे 20 वित्तीय सेवा कंपन्या आहेत. यामध्ये सिक्युरिटीज ब्रोकिंग, विमा आणि एआरसी यांचा समावेश आहे. RBI ने 30 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडलेल्या रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड बरखास्त केले होते आणि त्याविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू केली होती.