
नवे एनएफओ जाहीर होण्याची उत्सुकतेने प्रतीक्षा!
सोलापूर : शेअर बाजाराची झालेली घसरण पाहता, गुंतवणूकदार या स्थितीचा फायदा घेण्यासाठी सरसावले आहेत. पण नेमके याच काळात म्युच्युअल फंडचे नवे एनएफओ जाहीर होत नसल्याने त्याची प्रतीक्षा केली जात आहे. इंधन दरवाढ व महागाईने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला जोरदार फटका बसला आहे. विशिष्ट स्थितीमुळे बाजारात एक प्रकारची मंदी आली आहे. बाजाराच्या उलाढालीचा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला आहे. पूर्वी ६० हजारांपेक्षा अधिक निर्देशांकाचा आकडा आता कमी झाला आहे. या प्रकारची चढउतार सातत्याने सुरू असते.
पण जेव्हा निर्देशांक कमी होतो, तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध असते. कारण, शेअरची किंमत कमी झालेली असते. नंतर ती वाढणार असते, हे ही निश्चित मानले जाते. खरेदीदार या कालावधीत अधिकाधिक गूंतवणूक करत आहेत. या खरेदीला उत्साह वाढवणारे एनएफओ काही दिवसांपासून जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे नवगुंतवणूकदार एनएफओच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही जुन्या प्लान्समध्ये गुंतवणूकदार नियमितपणे त्यांची गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूक क्षेत्रात निर्देशांक कमी होणे ही गुंतवणुकीची संधी मानली जात असल्याने त्यानुसार गुंतवणूकदार गुंतवणूक वाढवत आहेत.
काय करावे गुंतवणूकदारांनी...
निर्देशांक वाढीपूर्वी योग्य प्लानची निवड करावी
उत्तम वाढ देऊ शकणाऱ्या शेअर्सची खरेदी उपयुक्त
गुंतवणुकीचा आढावा घेऊन त्यामध्ये योग्य ती वाढ करावी
निर्देशांक कमी झाला म्हणजे अधिक गुंतवणूक करणे योग्य
दीर्घकाळ गुंतवणुकीवर लक्ष ठेवून वाटचाल करावी
सध्या निर्देशांक कमी झाल्याने गुंतवणुकीची संधी वाढली आहे. कारण, या कालावधीत शेअरची खरेदी कमी दराने करता येते. नंतर त्याची किंमत पुढील काळात वाढत असते. सध्या कोणतेच नवे एनएफओ जाहीर झालेले नाहीत.
- हर्षल वेद, अध्यक्ष, सोलापूर म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर असोसिएशन
Web Title: Announcement Of Mutual Fund New Nfo Share Market Investment Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..