Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला

apple and blackberry
apple and blackberry

जगातील सर्वात मोठा मोबाईल ब्रँड अॅपल नव्या वर्षातही तेजीत घोडदौड करत आहे. या दिग्गज टेक कंपनीने इतिहास रचला आहे. नव्या वर्षात अॅपलची मार्केट व्हॅल्यू तीन ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत गेली आहे.

जगातील अन्य अग्रेसर कंपन्यांच्या तुलनेत हे Apple ने नवा पल्ला गाठला आहे. वॉलमार्ट, नायकी, एक्सॉन मोबिल, डिझनी, नेटफ्लिक्स, कोका-कोला, मॅकडोनाल्ड्स, एटीअँडटी, कॉमकास्ट, मार्गन स्टॅनले, गोल्टमॅन सॅक्स, बोईंग, आयबीएम आणि फोर्डच्या तुलनेत Apple या कंपनीची मार्केट व्हॅल्यू अधिक आहे.

न्यूयॉर्क टाईम्सनुसार १९७६ मध्ये सुरू झालेल्या अॅपल या कंपनीनं २०१८ मध्ये १ ट्रिलियन डॉलर्सची मॅजिक फिगर पार केली होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ४२ वर्षांची वाट पाहावी लागली होती.

स्टेटस सिंबल 'ब्लॅकबेरी'ने स्वत:चा गाशा गुंडाळला

तर एकेकाळचा जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन म्हणजे Blackberry ला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली आहे. कारण ब्लॅकबेरी आजपासून अधिकृतपणे काम करणं बंद करेल. एकेकाळी जगातील स्टेटर सिंबॉल म्हणून ओळखला जाणारा फोन अखेर बंद होत आहे.

जगभरात Qwerty Keypad लोकप्रिय करणारे फोन आता यापुढे काम करणार नाहीत. 4 जानेवारीपासून, स्मार्टफोन सेवा देण्यात येणार नाहीत. म्हणजेच डिव्हाइसेसवर वायफाय कनेक्शन, डेटा, फोन कॉल्स, एसएमएस किंवा इमर्जेंसी कॉल करता येणार नाहीत, असं कंपनीने स्पष्ट केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com