भारतात ‘ॲपल’चे पहिले पाऊल;ऑनलाइन स्टोअरचे २३ ला लाँचिंग 

वृत्तसंस्था
Saturday, 19 September 2020

ॲपलची उत्पादने सध्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स स्टोअर्सवरुन विकली जातात. मात्र, ॲपल स्वत:चे ऑनलाइन स्टोअर दिवाळीपूर्वी लाँच करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला आज पुष्टी मिळाली.

क्युपर्टिनो (अमेरिका) - भारतात २३ सप्टेंबरला ॲपल स्टोअर ऑनलाइन लाँच होणार असल्याचे ‘अॅपल’ कंपनीने जाहीर केले आहे. या ऑनलाइन स्टोअरद्वारे ॲपलचे विविध उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार असून प्रथमच कस्टमर सपोर्ट दिला जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ॲपलची उत्पादने सध्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स स्टोअर्सवरुन विकली जातात. मात्र, ॲपल स्वत:चे ऑनलाइन स्टोअर दिवाळीपूर्वी लाँच करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला आज पुष्टी मिळाली. हे स्टोअर बरेच आधी लाँच करायचे होते, मात्र दरम्यानच्या लॉकडाउनमुळे कामावर परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ॲपल स्टोअरवरून ग्राहकांना अनेक सुविधा थेट कंपनीकडूनच मिळणार असल्याने त्यांचा फायदा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ॲपल स्टोअरवरून मागविलेल्या वस्तू ग्राहकांना २४ ते ७२ तासांमध्ये मिळणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ॲपलचे ऑनलाइन स्टोअर हे भारतातील पहिले पाऊल असून पुढील वर्षी मुंबई आणि बंगळूरमध्ये ते शोरुम सुरु करणार आहेत. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ॲपल स्टोअरचे फायदे 
- ॲपलची सर्व उत्पादने मिळणार 
- ॲपल स्पेशालिस्टचे मार्गदर्शन मिळणार 
- थेट ॲपलकडून वापराबाबतचे मार्गदर्शन मिळणार 
- हिंदीमध्येही मार्गदर्शन मिळणार 
- खरेदीपूर्वी ‘मॅक’ कस्टमाइज करता येणार 
- विद्यार्थ्यांना विशेष सवलत 
- मॅक आणि आयपॅडचे विशेष दर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple to launch online store in India on September 23