एअर इंडियाकडून मार्चचे वेतन रखडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

बडोदा - निर्गुंतवणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या एअर इंडिया कंपनीने कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन अद्याप दिले नसून, वेतनाला विलंब होण्याची पूर्वसूचनाही दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. 
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियामध्ये २१ हजार कर्मचारी असून, यातील ११ हजारपेक्षा अधिक कायम कर्मचारी आहेत. एअर इंडिया सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याच्या ३० अथवा ३१ तारखेला आणि बॅंकेला सुटी असल्यास या तारखांच्या आधी त्या महिन्याचे वेतन करते.

एअर इंडियातील कर्मचारी 
एकूण - २१,०००
कायम - ११,२१४

Web Title: arthavishwa news air india march salary