ऑडीची वाहने महागणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नवी दिल्ली - लक्‍झरी कार सेगमेंटमध्ये मोडणारी ‘ऑडी’ आता महाग झाली आहे. केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आयात मोटारींवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ‘ऑडी’ महागणार आहे. कंपनीच्या सर्व मॉडेलच्या किमती पाच टक्‍क्‍यांनी वाढविण्यात येणार असल्यामुळे किमान १ लाख ते ९ लाख रुपयांपर्यंत वाहने महागणार असल्याचे ऑडी इंडियाने म्हटले आहे. ‘ऑडी’कडून सादर करण्यात आलेल्या एसयूव्ही प्रकारातील क्‍यू ३ ची किंमत ३५.३५ लाख रुपये ते स्पोर्टस प्रकारातील आर ८ ची किंमत २.६३ कोटी रुपये आहे. आयात शुल्क आणि सामाजिक कल्याण अधिभार आकारण्यात येणार असल्याने आयात वाहनांच्या किमती वाढणार आहेत. 

Web Title: arthavishwa news audi vehicle rate increase