‘भारत-२२’चा दुसरा टप्पा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘भारत-२२’ ईटीएफचा दुसरा टप्पा लवकरच बाजारात धडकणार आहे. पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन करणाऱ्या आयसीआयसीआय प्रूडेंशिअल म्युच्युअल फंडाने भारत-२२ ईटीएफच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रस्ताव ‘सेबी’कडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने ‘भारत-२२’ ईटीएफमधून १४ हजार ५०० कोटींचा निधी उभारला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीचे ८० हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे या वर्षातदेखील सरकारला ‘भारत-२२’ ईटीएफकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title: arthavishwa news Bharat-22 second step