‘भूषण स्टील’विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी दिल्ली - कर्जात बुडालेल्या भूषण स्टील आणि भूषण स्टील अँड पॉवर या दोन कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने बॅंकांना मंजुरी दिली आहे. भूषण स्टीलला कर्ज दिलेल्या बॅंकांच्या समूहाच्या वतीने स्टेट बॅंकेने आणि भूषण स्टील अँड पॉवरच्या विरोधात पंजाब नॅशनल बॅंकेने लवादाकडे याचिका दाखल केली होती. 

दिवाळखोरी आणि नादारी कायदा २०१६ नुसार याचिका दाखल केल्यानंतर कंपनीला मार्ग काढण्यासाठी १८० दिवसांची मुदत देण्यात येते. भूषण स्टीलकडे स्टेट बॅंकेची रु. ४२९५ कोटींची थकबाकी आहे. त्याबरोबर ४९० दशलक्ष डॉलरचे परकी चलनातील कर्ज देखील कंपनीने थकविले आहे. कर्जवसुलीसाठी बॅंकांनी दोन्ही कंपन्यांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे याचिका दाखल केली होती.

Web Title: arthavishwa news bhushan steel oppose process on insolvency

टॅग्स