पीकविम्याचे ७७०० कोटींचे दावे निकाली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - मागील खरीप हंगाम आणि विद्यमान रब्बी हंगामातील पीकविम्याचे ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून ९० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा पोचविल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या कृषी क्षेत्राशी संबंधित दोन महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यात ही माहिती कृषी खात्यातर्फे देण्यात आली. सॉईल हेल्थ कार्ड हे स्थानिक भाषेतच असावे, अशी सूचना पंतप्रधानांनी या वेळी केली. 

पंतप्रधान कार्यालय, कृषी मंत्रालय तसेच निती आयोगाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. यामध्ये १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सॉईल हेल्थ कार्डांच्या वितरणाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. उर्वरित राज्यांमध्ये या आठवडाभरात वितरण पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०१६ मधील खरीप हंगाम आणि २०१६-१७ मधील रब्बी हंगामातील ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. पिक विमा योजनेंतर्गत येणाऱ्या दाव्यांच्या अध्ययनासाठी आणि आकडेवारी जमा करण्यासाठी स्मार्टफोन, रिमोट सेन्सिंग, उपग्रह, ड्रोन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, अशी माहिती मोदींना देण्यात आली. मृदा नमुने घेणे आणि प्रयोगशाळांमधील चाचणी प्रक्रिया यात सूसुत्रता राखली जावी. यामुळे अहवालात स्पष्टता येईल. मृदा नमुने घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना वापर केला जावा, शेतकऱ्यांमध्ये सॉईल हेल्थ कार्डचा प्रसार आणि प्रभावी वापर यासाठी ते स्थानिक भाषेतच असावे, अशी महत्त्वाची सूचना मोदी यांनी केली. हातात मावणाऱ्या उपकरणांद्वारे या नमुन्यांची तपासणी केली जावी. यासाठी स्टार्टअप कंपन्यांना तसेच उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

१५१००.८३ कोटींचे भरपाईचे दावे
२०१६ मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेेअंतर्गत विमा कंपन्यांनी २०१६-१७ मध्ये २२३४४ कोटी रुपये प्रीमियम जमा केला, तर १५१००.८३ कोटी रुपयांचे भरपाईचे दावे सरकारपुढे आले आहेत. यातील ९४४६.८३ कोटी रुपयांच्या भरपाईला मान्यता देण्यात आली आल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.

Web Title: arthavishwa news crop insurance 7700 crore claim