‘गीतांजली’चे बाजारमूल्य गडगडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

मुंबई - शेअर बाजारात गीतांजली जेम्सच्या समभागातील घसरण सलग सातव्या सत्रात गुरुवारी सुरूच राहिली. कंपनीच्या समभागात आतापर्यंत ५८.५ टक्के घसरण झाली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्‍सी हा कंपनीचा प्रवर्तक आहे. 

गीतांजली जेम्सच्या समभागात आज ४.९२ टक्के घसरण होऊन तो २६.१० रुपयांवर आला. ही त्याची मुंबई शेअर बाजारातील सर्वांत खालची व्यवहारयोग्य पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातही कंपनीच्या समभागात ४.९२ टक्के घसरण होऊन तो २६.०५ रुपयांवर आला. मागील सात सत्रांत कंपनीच्या समभागात ५८.५ टक्के घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ४३५.४१ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. 

‘पीएनबी’तील ११ हजार ३४६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार १४ फेब्रुवारीला उघड झाला होता. या गैरव्यवहाराचा तपास विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे. या गैरव्यवहारात अब्जाधीश उद्योगपती नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी हे आरोपी आहेत. मोदी याच्याशी थेट निगडित कोणतीही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध नाही. मात्र, चोक्‍सी याची गीतांजली जेम्स शेअर बाजारात सूचीबद्ध आहे.

Web Title: arthavishwa news gitanjali market rate pnb mehul choksi