पुढील आठवड्यापासून ‘जीएसटीएन’ पोर्टल कार्यान्वित

पीटीआय
सोमवार, 17 जुलै 2017

नवी दिल्ली - येत्या २४ जुलैपासून ‘जीएसटीएन’ पोर्टल कार्यान्वित होणार असून व्यावसायिकांना यावर ‘जीएसटी’संबधीच्या पावत्या (इन्व्हॉइस) अपलोड करता येणार आहेत. १ जुलैपासून देशात जीएसटी लागू झाला असून व्यावसायिकांना ‘जीएसटीएन’वर एका वेळी १९ हजार ‘इन्व्हॉइस’चा डेटा अपलोड करता येणार आहे. 

‘इन्व्हॉइस’ अपलोड करण्याची सुविधा २४ जुलैपासून उपलब्ध केली जाईल, असे ‘जीएसटीएन‘चे अध्यक्ष नवीन कुमार यांनी सांगितले. सरकारने गेल्या महिन्यात व्यावसायिकांना पावती स्वरूपात नोंदी ठेवण्याची तात्पुरती सोय केली होती. हा संपूर्ण डेटा व्यावसायिकांना ‘जीएसटीएन’वर २४ जुलैपासून अपलोड करता येईल, असे कुमार यांनी सांगितले. ही पद्धत समजण्यासाठी माहितीपर व्हिडिओ उपलब्ध करण्यात आला आहे. २०० रुपयांहून अधिक रकमेची बिले इनपुट टॅक्‍स क्रेडिटसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या व्यावसयिकांची दररोज १० हजारांहून अधिक ‘इन्व्हॉइस’ आहेत, त्यांना दररोज, आठवड्याला आणि महिन्याला डेटा अपलोड करता येईल. याबाबत व्यापारी संघटनांशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
६९ लाख व्यावसायिकांची नोंदणी 
देशभरात आतापर्यंत ६९ लाख व्यावसायिकांनी ‘जीएसटीएन’वर नोंदणी केली आहे. यामध्ये उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर आणि सेवाकर नोंदणी असलेल्या व्यावसायिक करदात्यांचा समावेश आहे.

Web Title: arthavishwa news gstn portal execute in next week