एचडीएफसीच्या व्याजदरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने सलग चौथ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवल्यानंतर बॅंकांवरील दबाव वाढला आहे. यामुळे बॅंका आणि वित्तीय संस्थांकडून नजीकच्या काळात कर्जाचा दर वाढण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. व्याजदरवाढीची सुरवात गृहकर्ज देणारी मोठी वित्तसंस्था असलेल्या एचडीएफसीने केली असून, कर्जाच्या दरात ०.०५ टक्‍के ते ०.२० टक्‍के वाढ केली आहे.

एचडीएफसीने ३० लाखांपर्यंतचा गृहकर्जदर ८.४५ टक्के केला असून, यात ०.०५ टक्‍क्‍याची वाढ केली आहे. महिला कर्जदारांसाठी नवा कर्जदर ८.४० टक्के राहील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. वर्षभरात सरकारी रोख्यांमधील परताव्यात घसरण झाल्याने वित्तसंस्था आणि बॅंकांची चिंता वाढली आहे.

एचडीएफसीप्रमाणे इतर बॅंकांकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: arthavishwa news HDFC Interest rate increase