जागतिक अर्थव्यवस्थांत भारत ६२ वा

यूएनआय
मंगळवार, 23 जानेवारी 2018

दावोस - जागतिक आर्थिक परिषदेच्या (डब्ल्यूईएफ)’ सर्वसमावेशक विकास निर्देशांक-२०१८’ मध्ये भारत शेजारील चीन आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जाहीर झालेल्या १०३ देशांच्या या यादीत भारत ६२ व्या स्थानावर असून, चीन, पाकिस्तानने अनुक्रमे २६ व ४७ वे स्थान पटकविले आहे.

दावोस - जागतिक आर्थिक परिषदेच्या (डब्ल्यूईएफ)’ सर्वसमावेशक विकास निर्देशांक-२०१८’ मध्ये भारत शेजारील चीन आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जाहीर झालेल्या १०३ देशांच्या या यादीत भारत ६२ व्या स्थानावर असून, चीन, पाकिस्तानने अनुक्रमे २६ व ४७ वे स्थान पटकविले आहे.

डब्ल्यूईएफची बैठक उद्यापासून (ता. २३) सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर जगातील १०३ अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन करून त्यांची क्रमवारी दर्शविणारी यादी आज जाहीर करण्यात आली. ही क्रमवारी विकासाचा वेग, निष्पक्षपणा आणि स्थैर्य या निकषांवर आधारित असून, या पाहणीची दोन भागांत विभागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या भागात २९ विकसित, तर दुसऱ्या भागात ७४ विकसनशील अर्थव्यवस्थांना समावेश करण्यात आला आहे. भारत यामध्ये ६२ व्या स्थानावर असून, गेल्या वर्षी (२०१७) जाहीर झालेल्या ७९ देशांच्या यादीत भारत ६० व्या स्थानावर होता.

या क्रमवारीत भारत केवळ चीन आणि पाकिस्तानच नव्हे, तर शेजारील श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या देशांच्या तुलनेतही मागे असून, हे देश या यादीत अनुक्रमे ४०,३४ आणि २२ व्या स्थानावर आहेत. ‘ब्रिक्‍स’ अर्थव्यवस्थांपैकी रशियन फेडरेशन १९ व्या, ब्राझील ३७ व्या, तर दक्षिण आफ्रिका ६९ व्या स्थानावर आहे. ‘जी-७’ अर्थव्यवस्थांपैकी जर्मनी १२, कॅनडा १७, फ्रान्स १८, ब्रिटन २१, अमेरिका २३, जपान २४, आणि इटली २७ व्या स्थानावर आहे. 

अव्वल ठरलेले देश
सर्वसमावेशक विकास निर्देशांकात लिथुआनियाने उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तेथेच नॉर्वेची सर्वांत पुढारलेली अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. उद्योन्मुख अर्थव्यवस्थांमधील ‘जीडीपी’चा (६.८ टक्के) विचार करता चीनने अव्वल स्थान मिळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthavishwa news India is 62 rank in world economy