अवेरी डेनिसनतर्फे ‘इनोव्हेशन सेंटर’

अवेरी डेनिसनतर्फे ‘इनोव्हेशन सेंटर’

पुणे - लेबलिंग व पॅकेजिंग साहित्यांची जागतिक उत्पादक कंपनी असलेल्या अवेरी डेनिसन कॉर्पोरेशनने पुण्यात ‘इनोव्हेशन अँड नॉलेज सेंटर’ सुरू करीत असल्याची नुकतीच घोषणा केली. हे सेंटर साउथ एशिया पॅसिफिक अँड सब सहारन आफ्रिका येथील ग्राहक, भागीदार व कर्मचाऱ्यांना साह्य करेल.

अवेरी डेनिसनमधील या विभागाचे वरिष्ठ विपणन संचालक डॅरेन मिलिगॅन म्हणाले, की अवेरी डेनिसनचे इनोव्हेशन अँड नॉलेज सेंटर दोन प्रमुख केंद्रांपासून तयार झाले आहे. उद्योग भागीदारांचे सहयोग लाभलेले ‘नॉलेज सेंटर’ हे परंपरागत व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र आहे.

इनोव्हेशन सेंटरमध्ये उच्च शिक्षित आर अँड डी टीम व जागतिक दर्जाची विश्‍लेषणात्मक क्षमता आहे. एकाच ठिकाणी ही दोन्ही केंद्रे उपलब्ध करण्यासाठी उत्पादन विकसित करण्याला व ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारी सोल्यूशन्स जलदपणे देण्याला चालना देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com