गुंतवणूकदार धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

म्युच्युअल फंडातून 50 हजार कोटी काढले; भांडवली कराने हैराण
मुंबई - अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली कराची (लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स) घोषणा केल्यानंतर म्युच्यअल फंडातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातून तब्बल ५० हजार कोटींची गुंतवणूक काढून (रिडम्पशन) घेतली आहे. लिक्विड आणि डेट फंडांतून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्याचे दिसून आले आहे.

म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स ऑफ इंडिया (ॲम्फी)च्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ५० हजार ७५२ कोटींची गुंतवणूक काढून घेण्यात आली. मार्च २०१७ मध्ये गुंतवणूकदारांनी फंडातून ५४ हजार ८८३ कोटी काढून घेतले होते.

दरम्यान, दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात फंडातील गुंतवणूक काढण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो, असे जाणकारांचे मत आहे. मात्र, यंदा लागू झालेल्या दीर्घकालीन भांडवली कराची धास्तीदेखील गुंतवणूकदारांनी घेतली आहे. या कराचा फटका म्युच्युअल फंड योजनांना बसणार असल्याचे गुंतवणूकदार सावध झाल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले आहे. दरम्यान, मार्च महिन्यातील गुंतवणूक काढून घेण्यात संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेने इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. मार्च महिन्यात इक्विटी फंडात केवळ २ हजार ९५४ कोटींची गुंतवणूक झाली. गेल्या दीड वर्षातील ही नीचांकी गुंतवणूक आहे. 

म्युच्युअल फंडाची स्थिती
मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी काढून घेतले

५०,७५२ कोटी
२०१७-१८ वर्षातील एकूण गुंतवणूक
२.७२ लाख कोटी 
२०१६-१७ वर्षातील गुंतवणूक
३.४० लाख कोटी 

Web Title: arthavishwa news investor mutual fund