मारुती सुपर कॅरीला ‘कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’चा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सी. व्ही. ॲवॉर्डसमध्ये मारुती सुझुकी सुपर कॅरी लाइट कमर्शिअल व्हेईकलला मानाचे  पुरस्कार मिळाले. ‘स्मॉल कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’ व या वषीचा सर्वोच्च पुरस्कार ‘कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’वर मारुती सुझुकी सुपर कॅरीने आपले नाव कोरले.

मारुती सुझुकी चॅनलचे उपाध्यक्ष राम सुरेश अकेला; तसेच मारुती सुझुकी कमर्शिअल व रूरल मार्केटिंगचे महाव्यवस्थापक अरुण अरोरा यांनी हे पुरस्कार स्वीकारले. अकेला यांनी पुरस्काराचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत भारतीयांच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी उत्साह आल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार उत्पादनांच्या साहाय्याने मारुती सुझुकीने व्यावसायिक वाहन क्षेत्रात सुपर कॅरी ही पहिली मिनी-ट्रक आणली आहे.

Web Title: arthavishwa news maruti super carry commercial vehicle of the year award