पासपोर्टसाठी आता जन्म दाखला नको !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नवी दिल्ली - पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्म दाखला देण्याची गरज राहणार नसून पासपोर्टची प्रक्रिया सर्व भारतीय नागरिकांसाठी सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जन्म तारखेचा पुरावा म्हणून आता आधार किंवा पॅन कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे.

पासपोर्टबाबत नव्या नियमाविषयी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी नुकतीच संसदेत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पासपोर्ट नियमावली १९८० नुसार जन्माचा दाखला २६ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना जन्म तारखेचा पुरावा म्हणून दाखवणे बंधनकारक आहे. पासपोर्ट काढण्यासाठी सध्या जन्म दाखल्याची प्रत देणे गरजेचे होते. मात्र आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून आता आधार किंवा पॅन कार्ड ग्राह्य धरले जाणार आहेत.’’ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डही सादर करता येणार आहे. केंद्र सरकारने नियमात केलेल्या बदलामुळे कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: arthavishwa news No birth certificate for passport