‘प्राप्तिकर’ एक लाख नोटिसा धाडणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बॅंक खात्यांमध्ये रोकड जमा करणाऱ्या आणि करविवरणात संशयास्पद माहिती आढणाऱ्या एक लाखांहून अधिक करदात्यांना आणि कंपन्यांना प्राप्तिकर विभागाकडून लवकरच नोटिस पाठविल्या जाणार आहे. नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात करदात्यांना त्या पाठविल्या जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

बॅंक खात्यांत ५० लाखांहून अधिक रक्कम शिल्लक असूनही करविवरणात माहिती दडवणाऱ्या जवळपास ७० हजार कंपन्यांना पहिल्या टप्प्यात नोटिसा पाठविल्या जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३० हजार नोटिसा करदात्यांना पाठवण्यात येणार असून, त्यात त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर काही बॅंक खात्यांमध्ये आणि करविवरणपत्रांमध्ये प्राप्तिकर खात्याला संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. अशा करदात्यांची चौकशी करण्याची तयारी प्राप्तिकर खात्याने केली आहे. काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याचा संशय असलेल्या जवळपास २० हजार ५७२ खात्यांची छाननी केली जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: arthavishwa news one lakh notice by income tax