‘पेनिन्सुला लॅंड’चा गहुंजेत परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - केंद्र व राज्य सरकारकडून २०२२पर्यंत लाखो परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अशोक पिरामल समूहाचा भाग असलेल्या ‘पेनिन्सुला लॅंड’चा तब्बल एक हजार स्वस्त व परवडणाऱ्या घरांचा ५० एकर क्षेत्रातील ‘ॲड्रेसवन’ हा प्रकल्प गहुंजे येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक राजीव पिरामल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘एमसीए स्टेडियम’नजीक एक, दोन व तीन बीएचके प्रशस्त फ्लॅट सर्व खर्चांसह अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध केले जाणार आहेत. या वेळी नंदन पिरामल, ‘ॲनारॉक प्रॉपर्टीज कन्सल्टंट’चे अनुज पुरी आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: arthavishwa news peninsula land gahunje home project