परदेशातील मालमत्ता जप्ती अटळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणात आता सक्तवसूली संचालनालयाने नीरव मोदीची परदेशातील मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष न्यायालयात आज ‘लेटर रोगेटरी’साठीचा अर्ज मंजूर करून सहा देशांतील मालमत्तेसाठी ‘लेटर रोगेटरी’ जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार नीरवच्या अमेरिका, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, ब्रिटन आदी देशांतील मालमत्तांवर कारवाई करण्याची तयारी ‘ईडी’ने सुरू केली आहे. नीरवने प्रचंड संपत्ती परदेशात दडवून ठेवल्याचा दावाही ‘ईडी’ने केला आहे. 

काय आहे ‘लेटर रोगेटरी’?
दुसऱ्या देशात कायदेशीर कारवाई करण्यासाठी ‘लेटर रोगेटरी’ आवश्‍यक असते. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये कायदेशीर कारवाई करायची असल्यास त्याद्वारे एका देशातील न्यायालय दुसऱ्या देशातील न्यायालयास न्यायिक संमतीची विनंती करते. त्यासाठी ‘लेटर रोगेटरी’ अन्य देशांतील संबंधित न्यायालयांना पाठवणे बंधनकारक आहे.

Web Title: arthavishwa news pnb foreign property seized nirav modi