पाश्‍चिमात्य देशांनी जागे व्हावे - राजन

पीटीआय
बुधवार, 24 जानेवारी 2018

दावोस - विकसनशील अर्थव्यवस्थांशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेची दीर्घकाळ वाटचाल शक्‍य नाही, याची जाण पश्‍चिमेकडील जगाला व्हायला हवी, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पश्‍चिमेकडील देशांची लोकसंख्या वृद्ध होत असून, त्यांच्या उत्पादनासाठी प्रामुख्याने मागणी विकसनशील देशांतून येईल, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे त्यांनी नमूद केले. 

जागतिक आर्थिक परिषदेत बोलताना राजन म्हणाले, की पश्‍चिमेकडील देश ज्या वेळी विकसनशील देशांकडे मदतीसाठी जातील, त्या वेळी त्यांना अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील. याआधी तुम्ही फायदे देण्याचा विचार का केला नाही, अशी विचारणा विकसनशील देश पश्‍चिमी देशांकडे करतील. पश्‍चिमी देशांचा दृष्टिकोन लवकरात लवकर बदलायला हवा.

Web Title: arthavishwa news raghuram rajan talking