‘रिलायन्स’ची १७ टक्के वाढीने नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई - सुपरहिट ठरलेल्या रिलायन्स निप्पॉन लाइफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअरची आज राष्ट्रीय शेअर बाजारात २९५.९० रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्‍चित केलेल्या रु. २५२ या इश्‍यू प्राइसपेक्षा १७.४ टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. 

शेअरने आज इंट्राडे व्यवहारात २९८.७० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. दिवसअखेर तो १२.८५ टक्‍क्‍यांच्या वाढीसह २८४.४० रुपयांवर बंद झाला.  या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तब्बल ८१.५४ पटीने ओव्हर सबस्क्राइब झाला होता. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून ४ कोटी २८ लाख ४० हजार शेअरची विक्री करण्याचे निश्‍चित केले होते.

त्याबदल्यात गुंतवणूकदारांकडून ३४८ कोटी ५६ लाख शेअरची मागणी करण्यात आली. कंपनीने आयपीओसाठी २४७-२५२ रुपयांचा किंमतपट्टा निश्‍चित केला होता.

Web Title: arthavishwa news reliance 18% growth registration