एसबीआयच्या अधिकाऱ्यांची सीबीआयकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) विदेशी शाखांमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. जर्मनीतील फ्रॅंकफर्ट आणि मॉरिशसमधील ‘एसबीआय’च्या उपसरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. 

पीएनबीच्या मुंबईतील शाखेतून नीरव मोदी आणि मेहुल चोकसीच्या नावे बनावट लेटर ऑफ अंडरस्टॅंडिंग विदेशातील इतर भारतीय बॅंकांच्या शाखांना काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबत सीबीआयने या दोन अधिकाऱ्यांना विचारणा केली. आरबीआयच्या नियमानुसार जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी ९० दिवसांच्या मुदतीचे एलओयू काढले जातात, मात्र नीरव मोदी प्रकरणात या नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे.

Web Title: arthavishwa news SBI officer CBI inquiry Punjab national bank