सेन्सेक्‍स ३४ हजारांवर

पीटीआय
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील तेजीमुळे शेअर बाजारात गुरुवारी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने ३४ हजारांची पातळी पुन्हा ओलांडली आणि तो ३४ हजार १०१ अंशांवर बंद झाला. 

मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील तेजीमुळे शेअर बाजारात गुरुवारी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने ३४ हजारांची पातळी पुन्हा ओलांडली आणि तो ३४ हजार १०१ अंशांवर बंद झाला. 

माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग आणि कॅपिटल गुड्‌स क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील चांगल्या वाढीमुळे सेन्सेक्‍स आज सकाळी ३४ हजार १७७ या उच्चांकी पातळीवर पोचला. नंतर बांधकाम, धातू, आरोग्य सुविधा, ऊर्जा आणि सावर्जनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात सुरू झालेल्या नफेखोरीमुळे निर्देशांकात घसरण सुरू झाली. अखेर तो कालच्या तुलनेत १६० अंशांनी वधारून ३४ हजार १०१ अंशांवर बंद झाला. निर्देशांकाची २८ फेब्रुवारीनंतरची उच्चांकी पातळी आहे. त्या वेळी निर्देशांक ३४ हजार १८४ अंशांवर बंद झाला होता. मागील पाच सत्रांत निर्देशांकात ९२१ अंशांची वाढ झाली आहे. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ४१ अंशांनी वाढून १० हजार ४५८ अंशांवर बंद झाला. दरम्यान, काल (ता. ११) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३६२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १११ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. 

अर्थव्यवस्थेची वाढ ७.६ टक्के राहील - मूडीज 
मूडीज या पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २०१८ मध्ये ७.६ टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे. मागील वर्षी हा दर ६.२ टक्के होता. मूडीजने म्हटले आहे, की भारताची आर्थिक वाढ सकारात्मक असून, मालमत्ताधारित रोख्यांसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कर्जदारांचे उत्पन्न वाढून त्यांची कर्ज फेडण्याची क्षमता वाढणार आहे.

मागील पाच सत्रांत सेन्सेक्‍समध्ये ९२१ अंशांची वाढ
 सेन्सेक्‍स दोन महिन्यांनंतर  पुन्हा ३४ हजारांवर
 माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, कॅपिटल गुड्‌स क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात तेजी 
 बांधकाम, धातू, आरोग्य सुविधा, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात नफेखोरी 
 रुपया घसरल्याने टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्‍नॉलॉजी आणि टेक महिंद्रा वधारले 

Web Title: arthavishwa news sensex