शेअर बाजारावर ‘पीएनबी’चे सावट

Share-market
Share-market

सेन्सेक्‍स २२६; तर निफ्टी ७४ अंशांनी घसरला
मुंबई - ‘पीएनबी’मध्ये झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराचा परिणाम आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारावर दिसला. बॅंकिंगसह बहुतांश क्षेत्रातील समभाग घसरल्याचे चित्र होते. दिवसअखेर सेन्सेक्‍स २२६ अंशांनी घसरून ३३,७७५ अंशांवर स्थिरावला. निफ्टीही ७४ अंशांनी घसरून १०,३७८ अंशांवर बंद झाला. 

दिवसभरातील पहिल्या सत्रात सेन्सेक्‍स आणि निफ्टीत तेजी जाणवली. मात्र त्यानंतर सातत्याने घसरण झाली. दिवसभरातील घसरणीचा गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला. बाजारातील कमकुवत स्थितीमुळे गुंतवणूकदारांचे १.१२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी सेन्सेक्‍सच्या यादीतील एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल १ कोटी ४६ लाख ८५ हजार ६०१.१९ कोटी रुपये होते. सोमवारी दिवसअखेर यामध्ये १ लाख १२ हजार ८०८.१९ कोटी रुपयांची घट होऊन ते १ कोटी ४५ लाख ७२ हजार ७९३ कोटी रुपयांवर पोचले होते.

सेन्सेक्‍सच्या मंचावर मिडकॅप निर्देशांक १.०५ अंशांनी घसरून १६,४२९ अंशांवर बंद झाला. यामध्ये युनियन बॅंक, इंडियन बॅंक, वक्रांगी, एलटीआय, बॅंक ऑफ इंडिया, हडको, मुथुट फाइनान्स, सन टीवी, पेट्रोनेट, अजंता फार्मा आदी कंपन्यांचे शेअर ७.१९-३.५७ टक्‍क्‍यांदरम्यान घसरले. यासह स्मॉलकॅप निर्देशांक ०.९९ टक्‍क्‍यांनी घसरून १७,८५७ अंशांवर बंद झाला. स्मॉल कॅप समभागांमध्ये भूषण स्टील, मोनेट इस्पात, रेन इंडस्ट्रीज, आईसीआईएल, फोर्टिस, आयटीआय आदी कंपन्यांच्या समभागांमध्ये ५.२३-१९.८२ टक्के तेजी होती. 

मागील आठवड्यात शेअर बाजारामध्ये नकारात्मक स्थिती होती. या वेळी सेन्सेक्‍सची कामगिरी ३४ हजारांवर होती. मात्र पीएनबी गैरव्यवहार उघडकीस झाल्यानंतर बॅंकिंग क्षेत्राला हादरा बसला. त्यामुळे बाजारात पडझड जाणवली.

जागतिक मंचावर आशियाई देशांमधील जपानचा निक्केई बाजार १.९७ अंशांनी वधारला. हाँग काँग आणि चीनमधील बाजार सार्वजनिक सुटीमुळे बंद होता. युरोपीय बाजारांमध्ये तेजीचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com