व्हीआयपी रिगल व फ्रेंची कॅज्युअल्स सादर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पुणे - अंतर्वस्त्रांची कंपनी असलेल्या व्हीआयपी क्‍लोदिंग या कंपनीने आधुनिक भारतीय पुरुषांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ‘व्हीआयपी रिगल’ आणि ‘फ्रेंची कॅज्युअल्स’ ही दोन नवी उत्पादने नुकतीच पुण्याच्या बाजारपेठेत सादर केली. ‘व्हीआयपी रिगल’ हा समकालिन क्‍लासिक ब्रॅंड आहे, तर ‘फ्रेंची कॅज्युअल्स’ हा ब्रॅंड फॅशनकडे कल असलेल्या तरुणांसाठी आहे. अंतर्वस्त्रांचे रचनात्मक सौंदर्य अबाधित राखत ‘फिट’ हा महत्त्वपूर्ण घटक लक्षात घेऊन हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी, व्हीआयपी क्‍लोदिंग लि.चे सीईओ योगेश तिवारी, संचालक कपिल पठारे यांच्या हस्ते या उत्पादनांचे अनावरण करण्यात आले.

पुणे - अंतर्वस्त्रांची कंपनी असलेल्या व्हीआयपी क्‍लोदिंग या कंपनीने आधुनिक भारतीय पुरुषांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ‘व्हीआयपी रिगल’ आणि ‘फ्रेंची कॅज्युअल्स’ ही दोन नवी उत्पादने नुकतीच पुण्याच्या बाजारपेठेत सादर केली. ‘व्हीआयपी रिगल’ हा समकालिन क्‍लासिक ब्रॅंड आहे, तर ‘फ्रेंची कॅज्युअल्स’ हा ब्रॅंड फॅशनकडे कल असलेल्या तरुणांसाठी आहे. अंतर्वस्त्रांचे रचनात्मक सौंदर्य अबाधित राखत ‘फिट’ हा महत्त्वपूर्ण घटक लक्षात घेऊन हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी, व्हीआयपी क्‍लोदिंग लि.चे सीईओ योगेश तिवारी, संचालक कपिल पठारे यांच्या हस्ते या उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्हीआयपी क्‍लोदिंग वितरक उपस्थित होते. पुणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ असल्यामुळे आम्ही आमची नवी कलेक्‍शन्स केवळ याच भागात सादर केली आहेत आणि येत्या काळात देशभर ही उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे श्री. तिवारी म्हणाले. फिट, कापड आणि दर्जाचा या घटकांच्या बाबतीत व्हीआयपी कंपनीचा भर नेहमी उत्तम उत्पादने देण्याकडे असतो. डिझाईनच्या बाबतीत आमची कलेक्‍शन्स अत्यंत आधुनिक आहेत, असे श्री. पठारे म्हणाले.

Web Title: arthavishwa news vip regal & frenchie casuals