वारे निवडणुकीचे; हेलकावे शेअर बाजाराचे!

Voting
Voting

मागील आठवड्यात ‘सेन्सेक्स'' ३८,६९७ अंशांवर, तर ‘निफ्टी‘ ११,४१६ अंशांवर बंद झाला आहे. मागील आठवड्याच्या अखेरीस ‘सेन्सेक्स''ने ६२९, तर ‘निफ्टी‘ने १२९ अंशांची तेजी दर्शविली. अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’मध्ये शुक्रवारी १३४ अंशांची पडझड झाली. पुढील कालावधीसाठी भारतीय शेअर बाजाराचा विचार करता, ‘निफ्टी‘ची १०,७९०, तर ‘सेन्सेक्स''ची ३६,४९६ ही ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आधार पातळी आहे. फंडामेंटल्सप्रमाणे ‘निफ्टी‘तील कंपन्यांच्या अर्निंगचा म्हणजेच मिळकतीचा विचार करता, प्राईज अर्निंग रेशोनुसार(पीई रेशो) बाजार ३३ वर म्हणजेच महाग असल्याचे लक्षात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कशा पद्धतीने गुंतवणूक करावी?
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कालावधीत अमेरिकी शेअर बाजार हेलकावे खात असताना, भारतीय बाजारात शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करताना प्रथम बाजाराचे व्हॅल्यूएशन, नंतर बाजाराची दिशा पाहून ट्रेडिंगचे नियोजन करणे योग्य ठरते. सद्यःस्थितीत बाजार व्हॅल्युएशननुसार महाग असल्याने ट्रेडिंग असो, की लांब पल्ल्याची गुंतवणूक, मर्यादित भांडवल गुंतवणेच योग्य ठरू शकेल. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाचा विचार करता मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार, यावर्षी माहिती तंत्रज्ञान, अर्थात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी, तसेच फार्मा म्हणजेच औषध क्षेत्रातील कंपन्यांनी जोरदार तेजी दर्शविली आहे. 

‘स्टॉपलॉस’ ठेवून ट्रेडिंग करा!
शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंगचा विचार करता इप्का लॅबोरेटीज लि. या औषध क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात शुक्रवारी २२३५ या अडथळा पातळीच्या वर २२५३ अंशांवर बंद भाव देऊन शॉर्ट टर्म आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे इप्का लॅबोरेटीज या शेअरचा भाव १९८७ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत शॉर्ट टर्ममध्ये म्हणजेच आगामी १ ते ३ महिन्यांच्या कालावधीसाठी आणखी वाढ दर्शवू शकतो. आगामी कालावधीत ‘निफ्टी‘ने, तसेच इप्का लॅबोरेटीज या शेअरने तेजीचा कल दर्शविल्यास मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारून १९८७ या पातळीचा ‘स्टॉपलॉस’ ठेवून ट्रेडिंग करणे फायदेशीर ठरू शकेल. ‘फॉर्च्युन ५००’ मधील ६९ कंपन्यांना सेवा देणारी एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस) ही आयटी क्षेत्रातील कंपनी लाँग टर्मसाठी विचार करता गुंतवणूकयोग्य दिसत आहे. मात्र, बाजार महाग व्हॅल्युएशनला असल्याने धोका लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने मर्यादितच भांडवल गुंतविणे फायदेशीर ठरू शकेल. 

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करताना जोखीम ओळखून जाणकार सल्लागारांचा सल्ला घेणे हितकारक ठरते.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com