यंदा कर संकलनात लक्षणीय वााढ- अरुण जेटली

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाही सत्रांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा एकूण कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात सोन्याची आयात कमी झाल्याने सीमाशुल्कात घट झाली आहे.

केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतरच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत जेटली यांनी वरील माहिती दिली.

जेटली म्हणाले, "एप्रिल ते डिसेंबरदरम्यान प्रत्यक्ष कर संकलनात 12.01 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, अप्रत्यक्ष कर संकलनातदेखील तब्बल 25 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या काळात सीमाशुल्क 4.1 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात सोन्याची आयात घटल्याने या संकलनात घट झाली आहे."

"त्याचप्रमाणे, सेवा कर संकलनात 23.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. यासोबतच, केंद्रीय उत्पादन शुल्क कर संकलनात तब्बल 31.6 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे", असे जेटली यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक राज्यांच्या मूल्यवर्धित कर संकलनात मुबलक वाढ झाल्याचेही जेटलींनी नमूद केले.

Web Title: arun jaitley claims increase in tax collection