महसूल वाढत नाही तोपर्यंत 'जीएसटी'त कपात नाही 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल (गुरुवार) वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची  32 वी बैठक पार पडली. बैठकीत लहान व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. आता वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत उलाढाल (टर्नओवर) असणाऱ्या व्यावसायिकांना जीएसटीसाठी नोंदणी करण्यास सूट देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र जीएसटीच्या दराबाबत बोलताना जेटली  म्हणाले की, जोपर्यंत महसुलात वाढ होत नाही तोपर्यंत  'जीएसटी' दरात आणखी कपात करता येणार नाही. शिवाय अप्रत्यक्ष कराचे प्रमाण घटले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जीएसटी परिषदेने 'कॉम्पोझिशन स्कीम'ची सीमा वाढविण्याची औपचारिक मंजुरी दिली आहे. आता 'कॉम्पोझिशन स्कीम'ची सीमा 1.5 कोटी रुपयांपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ती आधी 1 कोटी रुपयांपर्यंत होती. या योजनेतील बदल 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत.   
 
Web Title: Arun Jaitley Rules Out GST Rate Cuts Until Revenues Improve