शेअर बाजारात तेजी कायम, टॉप 10 शेअर्सवर ठेवा आज नजर | Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

शेअर बाजारात तेजी कायम, टॉप 10 शेअर्सवर ठेवा आज नजर

बाजारात (stock market) गुरूवारीही खरेदीचा उत्साह कायम होता. निफ्टी (Nifty)सलग पाचव्या दिवशी तेजीत होता आणि 18250 च्या वर बंद झाला. गुरूवारच्या व्यवहारात मेटल, पॉवर आणि केमिकलमध्ये जोरदार खरेदी झाली, बँक निफ्टीमध्ये थोडीशी घसरण झाली. (stock market continues to rise Keep an eye on top 10 stocks today)


निफ्टी मोठ्या ट्रेडिंग रेंजमध्ये फिरताना दिसत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. डेली स्केलवर लॉन्गर लोअर विकसह कँडलसारखा एक छोटा डोजी तयार केला आहे. जे प्रत्येक घसरणीत खरेदी झाल्याचे संकेत आहेत. आता जर निफ्टीला 18,400 च्या दिशेने जायचे असेल तर त्याला 18,181 च्या वर राहावे लागेल. निफ्टीचा सपोर्ट वरच्या दिशेने 18,081-18000 च्या झोनकडे सरकला आहे.

हेही वाचा: कोटींचे कर्ज, पतीची आत्महत्या ते CCD ची सीईओ; मालविकाचा प्रवास

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीची तेजीची चिन्हे कायम असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल म्हणाले. लवकरच तो 1900-19500 च्या पातळीवर जाईल असेही ते म्हणाले. मार्केटमधील कोणत्याही करेक्शनवर खरेदीचा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय धातू आणि FMCG, रियल्टी, आयटी आणि ऑटो सेक्टरमध्येही खरेदीचा सल्ला त्यांनी दिला.


निफ्टीने डोजी कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जो बुल आणि बियर यांच्यातील अनिश्चिततेची परिस्थिती दाखवत आहे. पण बाजाराचा मीडियम टर्म आउटलुक पॉझिटीव्ह राहिला आहे. निफ्टी 18,200 च्या खाली घसरला तर तो 18140-18100 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, जोपर्यंत निफ्टी 18,200 च्या वर राहील तोपर्यंत तो 18,300-18350 च्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याचे चौहान म्हणाले.
दुसरीकडे निफ्टीसाठी 17940-18000 ची पातळी शॉर्ट टर्म सपोर्टचे काम करेल असे बोनान्झा पोर्टफोलिओचे विशाल वाघ म्हणाले. तर 18340 वर, रझिस्टेंस आहे असेही ते म्हणाले.
आजचे टॉप 10 शेअर्स

हेही वाचा: सॉलिड फंडामेंटल्स असणारे 2 स्टॉक्स, तज्ज्ञांचे फेव्हरिट!

आजचे टॉप 10 शेअर्स

टाटा स्टील (TATASTEEL)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

सनफार्मा (SUNPHARMA)

कोल इंडिया (COALINDIA)

लार्सन अँड टूब्रो (LT)

ट्रेंट (TRENT)

टाटा पॉवर (TATA POWER)

एमफॅसिस (MPHASIS)

माईंड ट्री (MINDTREE)

फेडेरल बँक (FEDERAL BANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share Market
loading image
go to top