बजाज फायनान्स FDवर देतंय आकर्षक व्याजदर; तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजाज फायनान्स FDवर देतंय आकर्षक व्याजदर; तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा

बजाज फायनान्स FDवर देतंय आकर्षक व्याजदर; तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा

पालकांनी त्यांच्या बालकाच्या भवितव्याचा विचार करून आर्थिक तरतुदीचे नियोजन आगाऊच करणे रास्त ठरते. प्रामुख्याने वाढत्या महागाईत, शिक्षण आणि आरोग्य देखभालीचा खर्च भरमसाठ आहे. जेव्हा बालकाच्या भविष्याचा विषय येतो, तेव्हा काळाच्या पुढचा विचार करणे समर्पक ठरते. तुमच्या वित्तीय नियोजनाला बळकटी मिळावी याकरिता योग्य साधनांत बचतीची रक्कम गुंतवली पाहिजे. जेणेकरून बाजारातील अस्थिर आणि अनिश्चित हालचालीत तुमची बचत सुरक्षित राहू शकेल.

फिक्स्ड डिपॉझीट हे सुरक्षित वित्तीय साधन मानले जाते. हा पर्याय दीर्घकालीन गुंतवणूक शिखरांकरिता अतिशय लोकप्रिय असून जमा सुरक्षा आणि वेळेवर परताव्याची खातरजमा करतो. रोख्याचा परतावा आणि बचतीत वृद्धी असे दोन लाभ तुम्हाला मिळू शकतात. सामान्यपणे फिक्स्ड डिपॉझीटवर मिळणारा व्याज दर कमी असतो, ज्याचा परिणाम मिळणाऱ्या उत्पन्नावर होतो. जर तुम्ही fixed deposit (फिक्स्ड डिपॉझीट) वर मिळणाऱ्या उच्च सुरक्षित जमासह आकर्षक परताव्याचा विचार करत असाल, तर बजाज फायनान्स ऑनलाईन एफडी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

तुम्ही याकरिता बजाज फायनान्स एफडी ऑनलाईनमध्ये गुंतवणूक केली पाहिजे :

आकर्षक परतावे :

फिक्स्ड डिपॉझीटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्राथमिक फायदा म्हणजे परिपक्वतेवर वेळेवर परताव्याची खातरजमा राहते. त्यामुळे महत्त्वाच्या वित्तीय ध्येये जसे की, बालकाचे शिक्षण, महाविद्यालय, विवाह इत्यादीकरिता हा आदर्श गुंतवणूक पर्याय ठरतो. लवकर सुरुवात करणे महत्त्वाचे असते. कारण अशाप्रकारच्या ध्येयांना वेळेचे बंधन असते. एखाद्याने ठरावीक कालावधीकरिता निश्चित रक्कम बालकाच्या भवितव्याकरिता गुंतवल्यास आगामी काळातील खर्चाचे व्यवस्थापन सहज होऊ शकते.

समजा एखाद्या 60 वर्षांखालील व्यक्तीने बजाज फायनान्स एफडी’मध्ये 2-वर्षे, 3-वर्षे आणि 5-वर्षांच्या कालावधीकरिता रु 2 लाखांची गुंतवणूक केली. बजाज फायनान्स’कडून खालील FD rates (एफडी दर) देण्यात येतात.

गुंतवलेली रक्कम (रुपयांत)

कालवधी लागू व्याज दर (%) व्याजाची रक्कम (रू.) परिपक्वतेवर रक्कम (रू.)

2,00,000 2 6.20 25,569 2,25,569

2,00,000 3 6.60 42,271 2,42,271

2,00,000 5 6.60 75,306 2,75,306

बालकाच्या उच्च शिक्षणाशी निगडीत खर्च करण्याकरिता या परिपक्वता रक्कमेचा वापर करता येईल.

सर्वोच्च सुरक्षा जमा ठेव

स्वत:कडील बचत पद्धतशीर वाढविण्याचा सुरक्षित मार्ग म्हणजे एफडी! या रकमेवर बाजार अस्थिरतेचा कोणताही परिणाम होत नाही. बजाज फायनान्स एफडी’ला क्रिसील’च्या एफएएए रेटींग आणि आयसीआरए’च्या एमएएए रेटींगची अधिस्वीकृती असून या दोन्हीमुळे तुम्ही कष्टाने कमावलेली रक्कम सुरक्षित राहते.

एफडी सुविधेच्या बदल्यात कर्ज

Bajaj Finance online FD (बजाज फायनान्स ऑनलाईन एफडी) मध्ये तुमची एफडी परिपक्वता कालावधीपूर्वी न तोडता रोख रकमेची गरज पूर्ण करण्याचा पर्याय देते. तुम्हाला एफडीच्या बदल्यात गुंतवलेल्या रकमेच्या 75% पर्यंत सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. तुम्ही किमान दस्तावेजासह स्वत:च्या एफडीवर कर्ज घेऊ शकतात, ही झटपट प्रक्रिया असून त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.

सुलभ ऑनलाईन गुंतवणूक प्रक्रिया

बजाज फायनान्स ऑनलाईन एफडी’ सह तुम्ही सर्वंकष दस्तावेज-रहित आणि ऑनलाईन प्रक्रियेसह केवळ काही मिनिटांत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला या प्रक्रियेकरिता लांबलचक रांगेत उभे राहण्याची किंवा एफडी शाखेत स्वत: जाऊन भरगच्च कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आरामात घरी बसून गुंतवणूक करू शकता. आता तुम्ही आवश्यक ती माहिती घेऊन बजाज फायनान्स ऑनलाईन फिक्स्ड डिपॉझीटमध्ये गुंतवणूक करून तुमच्या बालकाचे वित्तीय भवितव्य सुरक्षित करू शकता.

loading image
go to top