मल्टी-ॲसेट फंड : गुंतवणुकीचा सुलभ पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multi-asset mutual Funds

सर्व मालमत्ता वर्गांची वेगवेगळी बाजारचक्रे आणि वैशिष्ट्ये असतात

मल्टी-ॲसेट फंड : गुंतवणुकीचा सुलभ पर्याय

- अतुल राठी

सर्व मालमत्ता वर्गांची वेगवेगळी बाजारचक्रे आणि वैशिष्ट्ये असतात. त्या त्या वेळी आर्थिक परिस्थितींवर अवलंबून, प्रत्येक मालमत्तेची परताव्याच्या अनुषंगाने निर्णायक भूमिका असते. बऱ्याचदा असे घडते, की जेव्हा गुंतवणूक भांडारातील एक किंवा अधिक मालमत्ता चांगली कामगिरी करीत असतात,

तर उर्वरित मालमत्ता खराब कामगिरी करीत असतात. काही वेळा याच्या उलटही घडते. त्यामुळे, एका विशिष्ट मालमत्तेमध्ये गुंतवणूक केंद्रीत असणे हे एकूण गुंतवणुकीच्या कामगिरीसाठी घातक ठरू शकते. येथेच मालमत्ता वाटपाचे धोरण गुंतवणूकदारांच्या कामी येते आणि त्यांना विविधांगी मालमत्तेचे इष्टतम लाभ एकाच ठिकाणी मिळतील, याची खात्री केली जाते.

मालमत्ता वाटप हे अशी बहुगुणी, सदाबहार धोरण आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने बाजारातील चक्राकडे दुर्लक्ष करून या धोरणाला चिकटून राहिले पाहिजे. सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत, ही म्हण प्रसिद्ध आहे.

या म्हणीशी या धोरणाचे साधर्म्य आढळून येते. वेळोवेळी जोखीम-समायोजित, अपेक्षेच्या जवळपास जाणारा आणि स्थिर परतावा मिळविण्यासाठी सर्व मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीचे वैविध्य जपण्याचा सल्ला दिला जातो.

मल्टी-ॲसेट फंड तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतो. शेअर (इक्विटी), रोखे (डेट), सोने आणि पायाभूत सुविधांशी संबंधित ‘इन्व्हिट्स’ आणि ‘रिट्झ’ या सारख्या साधनांत हे फंड गुंतवणूक करतात.

शेअरमधील गुंतवणूक दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करते, तर रोखे गुंतवणुकीतील स्थिरता वाढवतात आणि सोने महागाईविरूद्ध मजबूत संरक्षण प्रदान करते. मल्टी-ॲसेट फंड एकाच फंडात या भिन्न मालमत्तांच्या संयोजनातून गुंतवणूक केली जाते. यामुळे पोर्टफोलिओ मजबूत होतो. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्धोक आनंददायी अनुभव घेता येतो.

गुंतवणुकीतील जोखमीचे व्यवस्थापन करत असताना, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओतील फेररचनेबद्दलच्या चिंतेची देखील काळजी घेतली जाते. ऐतिहासिकदृष्ट्या असे दिसून आले आहे, की बाजारातील वादळी चढ-उतारानंतरही मालमत्ता वाटप धोरणाची शिस्तीने कास धरणारे गुंतवणूकदार अधिक श्रीमंत झाले आहेत.

मल्टी-ॲसेट फंड गुंतवणूकदारांना एका विशिष्ट मालमत्ता वर्गाशी खूपच अधिक आत्मीयता विकसित करू देत नसल्यामुळे, या फंडातील गुंतवणुकीचा अनुभव चांगला असल्याचे दिसून येते.

मल्टी-ॲसेट फंडाची वैशिष्ट्ये

  • तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक

  • शेअर, रोखे व सोने आणि पायाभूत सुविधांशी संबंधित पर्याय

  • शेअरमधील गुंतवणूक दीर्घकालीन संपत्तीनिर्माणास मदत

  • रोखे गुंतवणुकीमुळे स्थिरतेत वाढ

  • सोने हे महागाईविरुद्ध संरक्षण देते.

आयसीआयसीआय प्रूडेन्शियल मल्टी-ॲसेट फंड

आयसीआयसीआय प्रूडेन्शियल मल्टी-ॲसेट फंड, या श्रेणीतील उपलब्ध सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या पर्यायांपैकी एक फंड असून, व्यावसायिक व्यवस्थापनासह वैविध्यपूर्ण मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक योग्य पर्याय आहे. ही योजना तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम आणि सातत्यपूर्ण परतावा देत आली आहे. या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदार एकाच पोर्टफोलिओद्वारे विविध मालमत्तेत गुंतवणूक करू शकतात. या फंडांची रचना पाहता, गुंतवणूकदार त्यांच्या एकरकमी गुंतवणुकीसाठीदेखील या फंडाचा विचार करू शकतात.