‘दी $100 स्टार्ट-अप’

‘दी $100 स्टार्ट-अप’

सर्वसामान्यांचा असा एक समज असतो, की एखादा नवा व्यवसाय (स्टार्ट-अप) सुरू करायचा म्हणजे जागा खरेदी करावी लागते, स्वतःकडे भरपूर भांडवल असावे लागते किंवा मोठे कर्ज काढावे लागते, माणसे नेमावी लागतात. परंतु, इंटरनेट व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता १०० डॉलर एवढी छोटी रक्कम जवळ असतानासुद्धा तुम्ही स्वतःचा छोटा उद्योग सुरू करून आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगू शकता, हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ बेस्टसेलर लेखक क्रिस गिलेबो यांनी आपल्या ‘दी $100 स्टार्ट-अप’ या प्रसिद्ध पुस्तकातून अनेक केस-स्टडींच्या आधारे दाखवून दिले आहे. 

या पुस्तकातील काही ठळक मुद्दे असे 

  • सर्वप्रथम आपले ‘पॅशन’ किंवा विशेष कौशल्य काय आहे, ते ओळखा.
  • माझ्या कौशल्याचा वापर करून मी जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोगी पडू शकेन, याचा विचार करा.
  • पूर्ण जग ही बाजारपेठ मानून, तुमचे ग्राहक तुम्हाला पैसे कसे पाठवू शकतील आणि तुम्ही त्यांना वस्तू किंवा सेवा कशी पुरवाल, याचाही विचार करा.
  • नियोजनापेक्षासुद्धा कृतीला महत्त्व द्या. 
  • ८० पानांचा व्यवसाय आराखडा बनविण्यापेक्षा एका पानाचा आराखडा बनवा.
  • शक्य तितक्या लवकर तुमची पहिली विक्री होण्यावर भर द्या. तुमची वस्तू किंवा सेवा चांगली असेल तर विक्री आपोआपच वाढेल.
  • स्वतःला झेपेल, आवडेल तेवढाच व्यवसाय वाढवा.
  • स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही भागीदारी, आऊटसोर्सिंग, फ्रॅंचायझि़ंगचा उपयोग करू शकता.
  • तुमचा व्यवसाय सुरू करताना चांगली ऑफर किंवा ‘लाँचिंग इव्हेंट’द्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्या.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाने अनेक नोकरी नसणाऱ्यांना किंवा सुटलेल्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून, स्वतःचे आयुष्य स्वतःला आवडेल त्या पद्धतीने व स्वाभिमानाने जगण्यास प्रोत्साहित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com