‘द रियल वॉरन बफे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Sule write book review the real warren buffett share market invetment

बर्कशायर हॅथवे कंपनी; ‘बर्कशायर’च्या एका शेअरची किंमत ४,९४,३४३ डॉलर व मार्केट कॅपिटलायझेशन ७०० अब्ज डॉलर आहे!

‘द रियल वॉरन बफे’

जेम्स ओलवलीन हे ‘जेओएल कन्सल्टिंग’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून, त्यांनी या पुस्तकाद्वारे वॉरन बफे हे बर्कशायर हॅथवे कंपनी कशी चालवतात, यावर प्रकाश टाकला आहे. आज ‘बर्कशायर’च्या एका शेअरची किंमत ४,९४,३४३ डॉलर व मार्केट कॅपिटलायझेशन ७०० अब्ज डॉलर आहे! या कंपनीत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक उपकंपन्या समाविष्ट आहेत. मग वॉरन बफे इतके व्यवसाय कसे काय सांभाळू शकतात, हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. लेखकाने सांगितले आहे, की ‘बर्कशायर’चे अध्यक्ष म्हणून वॉरन बफे फक्त दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी करतात, त्या म्हणजे ‘बर्कशायर’च्या उपकंपन्यांनी कमावलेल्या नफ्याचा उत्तम विनियोग करणे आणि या कंपन्यांच्या मालकांना किंवा मुख्य अधिकाऱ्यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे कंपनी चालविण्याचे स्वातंत्र्य देणे!

‘बर्कशायर’च्या छत्रछायेखाली येण्यासाठी कंपनी कशी असावी, याची जाहिरात बफे १९८२ पासून आपल्या वार्षिक अहवालातून करीत आले आहेत, ते निकष असे- वॉरन बफे यांना सगळे जग ओळखते ते शेअर बाजारातील एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून. मात्र वॉरन बफे हे एका बलाढ्य कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची ही वेगळी ओळख लेखकाने या पुस्तकाद्वारे वाचकांना करून दिली आहे. बफे यांच्या व्यावसायिक पैलूंचे दर्शन घडवणारे हे पुस्तक निश्चितच वाचनीय आहे.

  • कंपनीचा नफा पाच कोटी डॉलरपेक्षा अधिक असावा.

  • कंपनीने सातत्याने नफा कमविलेला असावा. भविष्यकाळात कंपनी किती चांगली कामगिरी करणार आहे, यात आम्हाला रस नाही.

  • भागभांडवलावर उत्तम परतावा मिळविणारी आणि अगदी कमी कर्ज डोक्यावर असलेली कंपनी उत्तम. कर्ज नसल्यास फारच छान.

  • कंपनीचे व्यवस्थापन उत्तम दर्जाचे असावे. आम्ही व्यवस्थापन पुरवू शकत नाही, याची नोंद घ्यावी.

  • तुम्ही कंपनी किती किमतीला विकायला तयार आहात, ते स्पष्ट करावे.

  • कंपनीचा व्यवसाय समजण्यास सोपा असावा.

  • छोट्या कंपन्या खरेदी करण्यात आम्हाला रस नाही. ५ ते २० अब्ज डॉलरची खरेदी करायला आम्हाला आवडते.

  • सध्याच्या व्यवस्थापनाच्या इच्छेविरुद्ध खरेदी करण्यात आम्हाला रस नाही.

  • आपण दिलेली ऑफर पूर्णपणे कॉन्फिडेन्शिअल ठेवण्यात येईल याची खात्री बाळगा.

  • ऑफर मिळाल्यानंतर जास्तीत जास्त पाच मिनिटांत हो किंवा नाही हा निर्णय आपल्याला कळविण्यात येईल. आमचा फोन न झाल्यास रस नाही, असे समजावे.

Web Title: Atul Sule Write Book Review The Real Warren Buffett Share Market Investment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top