‘अर्थ’बोध : मल्टि-बॅगर्स

अतुल सुळे
Monday, 11 January 2021

शेअर बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदाराचे असे एक स्वप्न असते, की आपल्या हाती एक तरी ‘मल्टि-बॅगर’ शेअर लागावा. शेअर बाजाराच्या भाषेत ‘मल्टि-बॅगर’ शेअर म्हणजे ज्याचा भाव दहापट, शंभरपट होतो. परंतु, असा शेअर लवकरात लवकर शोधणे, त्याचा भाव काही पटींत वाढेपर्यंत तो ‘होल्ड’ करणे, हे दिसते तितके सोपे नसते.

शेअर बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदाराचे असे एक स्वप्न असते, की आपल्या हाती एक तरी ‘मल्टि-बॅगर’ शेअर लागावा. शेअर बाजाराच्या भाषेत ‘मल्टि-बॅगर’ शेअर म्हणजे ज्याचा भाव दहापट, शंभरपट होतो. परंतु, असा शेअर लवकरात लवकर शोधणे, त्याचा भाव काही पटींत वाढेपर्यंत तो ‘होल्ड’ करणे, हे दिसते तितके सोपे नसते. त्यासाठी अर्थव्यवस्थेचा, कंपनीचा सखोल अभ्यास तर करावा लागतोच; याशिवाय तुमच्याकडे भरपूर ‘पेशन्स’ असावे लागतात. लेखक तेजस्वी नांदुरी यांनी आपल्या ‘मल्टि-बॅगर्स’ या पुस्तकात याबाबत चांगले मार्गदर्शन केले आहे. लेखक एका खासगी फंडाचे मॅनेजर असून, त्यांनी मॅकिन्सी अँड कंपनीत मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. लेखकाने खालील ठळक मुद्द्यांवर भरपूर उदाहरणे व चार्टसह मार्गदर्शन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • मल्टि-बॅगर शेअर लवकरात लवकर कसा ओळखावा?
  • एखाद्या व्यवसायातील किंवा अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे बदल मार्केटच्या आधी कसे ओळखावेत?
  • मल्टि-बॅगरचे वेगवेगळे प्रकार, उदाहरणार्थ - नव्या कंपन्या, दुर्लक्षित कंपन्या, कात टाकणाऱ्या कंपन्या.
  • हे शेअर नक्की कधी खरेदी करावेत?
  • हे शेअर कधीपर्यंत ‘होल्ड’ करावेत?
  • असे शेअर कधी विकावेत?

चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखकाने भारतीय शेअर बाजारातील १० मल्टि-बॅगरची माहिती ‘केस स्टडीज’च्या स्वरूपात दिली आहे. त्यापैकी डॉक्टर रेड्डीज लॅब, इन्फोसिस, हिरो होंडा यांसारख्या कंपन्या अजूनही चांगली कामगिरी करीत आहेत; तर मोझर बेअर, युनिटेक यांसारख्या कंपन्यांचे आता ‘पेनी स्टॉक’ झाले आहेत. यावरून, ‘मल्टि-बॅगर’ परतावा मिळविण्यासाठी सतत अभ्यास करावा लागतो, भरपूर ‘पेशन्स’ असावे लागतात. शिवाय, सतत जागृत राहावे लागते, हेच सिद्ध होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Sule Writes about Multi baggers