
लस्टरमाध्यमातून 54 कोटी 50 लाख डॉलर्स गु्ंतवणूक होणार आहे. कर्नाटक सरकारच्या सहकाऱ्याने एक्युझ एसईझेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी क्लस्टरचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस उभारत आहे.
बेंगळुरू : खेळण्यांच्या बाजारपेठेतील चीनची मक्तेदारी मोडून काढण्याची तयारी आता भारताने सुरू केली आहे. खेळण्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातीलच एक भाग म्हणून, देशात खेळणी उत्पादनाचे स्वतंत्र क्लस्टर उभारण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये देशातील असे पहिले क्लस्टर उभारण्यात येत असून, त्याची पायाभरणी करण्यात आली आहे.
कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यातील भानापूर येथे शनिवारी, खेळण्यांच्या स्वतंत्र क्लस्टरची पायाभरणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्या हस्ते हा पायाभरणी समारंभ झाला. या क्लस्टरमाध्यमातून 54 कोटी 50 लाख डॉलर्स गु्ंतवणूक होणार आहे. कर्नाटक सरकारच्या सहकाऱ्याने एक्युझ एसईझेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी क्लस्टरचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस उभारत आहे. भानापूर गावातील 400 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून, यातून एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
आणखी वाचा - निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा
भारताला मोठी संधी
खेळण्यांच्या या क्लस्टरमध्ये एकूण 100 कारखाने असणार आहेत. यातून 25 ते 30 हजार जणांच्या हाताला थेट काम मिळणार आहे. तर अप्रत्यक्षपणे एक लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा दावा मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी केला आहे. जगातील खेळण्यांच्या बाजारपेठेत 8 हजार कोटींची उलाढाल होत आहे. एकट्या भारतातील खेळण्यांची बाजारपेठ 1 हजार कोटींची आहे. मात्र, दुदैवाने यातील 60 टक्के खेळणी आयात केली जातात. आम्ही या क्लस्टरच्या माध्यमातून खेळण्यांच्या उत्पादनात भारत एक नवीन सुरुवात करेल, अशी आशा करत आहोत, असं मत एक्युझ कंपनीचे चेअरमन अरविंद मिल्लिगेरी यांनी व्यक्त केलंय. येत्या पाच वर्षांत खेळण्यांच्या क्लस्टरमध्ये 45 कोटी डॉलरची गुंतवणूक होईल, असं मत अवजड उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केलंय.
कोणत्या कंपन्या येणार?
आणखी वाचा - ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात
क्लस्टरमध्ये काय असणार?
या क्लस्टरमध्ये खेळण्यांची डिझायनिंगपासून, टुलिंग, मोल्डिंग, असेंब्लिंग, पेंटिंग, पॅकिंग, टेस्टिंग आणि वेअर हाऊसिंग मॅनेजमेंट अशी सर्व प्रकारची कामे होणार आहेत. स्पेशल इकॉनॉमिक झोनसोबतच फ्री ट्रेड वेअर हाऊसिंग (गोडाऊन्स) सुविधाही या क्लस्टरमध्ये असणार आहे.
भाजपच्या काळात काम
कर्नाटकमध्ये सरकारची सूत्रे भाजपच्या हाती आल्यानंतर या क्लस्टरच्या कामाला वेग आला. सुरुवातीला हे क्लस्टर रामनगर जिल्ह्यात होणार होते. मात्र, त्यानंतर कोप्पल जिल्ह्याची निवड करण्यात आली. क्लस्टरचे ठिकाण राज्याची राजधानी बेंगळुरूपासून 380 किलोमीटवर आहे. हैदराबादपासून 400 तर, हुबळी (95) आणि बेळगाव (215) या औद्योगिक क्षेत्रापासूनही जवळ असल्याने या जिल्ह्याची निवड करण्यात आली.