‘ऑडी’ला ठोठावला ८० कोटी युरोचा दंड

पीटीआय
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

फ्रॅंकफर्ट, (जर्मनी) - इंधन प्रदूषण चाचणी गैरव्यवहारप्रकरणी (डिझेलगेट) जर्मन सरकारने ‘फोक्‍सवॅगन’चा लक्‍झरी ब्रॅंड ‘ऑडी’ला ८० कोटी युरोचा दंड ठोठावला असून, ही रक्कम भरण्यास कंपनी तयार असल्याची माहिती फोक्‍सवॅगनने दिली.

कंपनीने डिझेल वाहनांत वापरलेल्या व्ही ६ आणि व्ही ८ इंजिनमुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याचे समोर आले असून, त्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला. फोक्‍सवॅगनने यासंदर्भात एक पत्रक जारी करून आपली बाजू मांडली. हा दंड आम्हाला मान्य असून, कंपनी या निर्णयाविरोधात कोणतेही अपील करणार नाही, असे पत्रकात नमूद आहे. या दंडाचा परिणाम चालू वर्षातील उत्पन्नावर होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एक कंपनी म्हणून ऑडीविरोधातील प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला असला तरी, फोक्‍सवॅगन समूहातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरोधातील तपास मात्र, सुरूच राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audi fined 80 million Euros penalty